Breaking News

Yearly Archives: 2020

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम

तीन वर्षांच्या मुलाचा तोडला लचका खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील सोमजाईवाडी येथे मंगळवारी (दि. 4) सकाळी तीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने लचका तोडला. श्रेयस गुरव असे बालकाचे नाव असून, कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूचे मांस निघाले आहे. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला आहे. खोपोली शहरात सध्या कुत्र्यांचा हैदोस …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची उद्या जिल्हा परिषदेवर धडक

प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आंदोलनाचे हत्यार अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी गुरुवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आयटकशी संलग्न रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ऑनलाइन वेतन सुरू झाले आहे, मात्र …

Read More »

सुधागडातील मोबाइल टॉवर्स सील

महसूल विभागाची कारवाई; थकबाकीदार कंपन्यांना शिकवला धडा पाली : प्रतिनिधी मोबाइल कंपन्यांच्या सुधागड तालुक्यातील एकूण 11 टॉवर्सला  महसूल प्रशासनाने 1 आणि 3 फेब्रुवारीला सील लावले आहे. तालुक्यातील प्रत्येक मोबाइल टॉवर कंपनीकडे 51 हजार 950 म्हणजे एकूणच चार लाख 67 हजार 550 रुपयांची थकबाकी होती. आदिवासीबहुल सुधागड तालुक्यात मोबाइल नेटवर्क व …

Read More »

प्लास्टिक बॅगविरोधात जनजागृती

गोेरेगावमधील नायडू प्री स्कूलची रॅली; कापडी पिशव्यांचे वाटप माणगाव : प्रतिनिधी नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये प्लास्टिक बॅगविरोधात रॅली काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे आवाहन केले, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप केले. गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी सरपंच जुबेर अब्बासी व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसमोर नाटुकली सादर करून …

Read More »

कानसा वारणा फाऊंडेशन सन्मानित

मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे कुलाबा प्रभात वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले. यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्य करणार्‍या कानसा वारणा फाऊंडेशन या संस्थेच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

खोपोली रेल्वेस्थानक परिसराला रिक्षांचा विळखा

प्रवासी, नागरिकांसाठी डोकेदुखी खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर रेल्वेस्टेशन रोड, दीपक चौक, बाजारपेठ, समाज मंदिर रोड येथे वाहतूक कोंडी कायमची समस्या बनली आहे.रेल्वे स्टेशन परिसराला तर प्रवासी वाहतूक रिक्षांचा विळखा पडला असून दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्याने येथून मार्ग काढण्यासाठी प्रवाशांना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील …

Read More »

मानसी वैशंपायन यांना शिक्षण माझा वसा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त : उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून फडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांना शिक्षणविवेक पुणे व लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2020 साठी दिल्या जाणार्‍या ‘शिक्षण माझा वसा’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानसी वैशंपायन यांचा हा गौरव नुकताच पुणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे …

Read More »

सडलेल्या जलवाहिन्यांतून श्रीवर्धनला पाणीपुरवठा

श्रीवर्धन : प्रतिनिधी शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानवली धरणातून श्रीवर्धनला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी सुमारे 40 वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ती जीर्ण झाल्याने त्यातून अनेक वेळा गंजयुक्त व शेवाळयुक्त पाणी येते, तसेच ही जलवाहिनी ठिकठिकाणी फुटण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेचा …

Read More »

लढवय्ये सूर्याजी मालुसरेंची समाधी उपेक्षित

हिंदवी स्वराज्यातील तहामध्ये गमावलेले किल्ले परत भगव्याखाली आणण्याच्या मोहिमेची सुरुवात कोंढाणा किल्ला ताब्यात घेऊन कामगिरी फत्ते करून करण्यात आली. याकामी तान्हाजी मालुसरे धारातिर्थी पडले तर मावळ्यांमध्ये वीरश्री संचारण्यासाठी त्यांचे बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांनी दिलेली ’बाप धारातिर्थी पडला म्हणून पळून का रे जाता? गडाचा दोर कापला आहे…लढून मरा नाहीतर उड्या …

Read More »

योग केंद्राचा 31वा वर्धापन दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन त्यांना ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या पनवेलच्या योग केंद्राने नुकतीच 31 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) चिंतामणी सभागृहात झालेल्या केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पनवेलमधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कांचन जनार्दन …

Read More »