पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार नियम व अटी-शर्तींचे पालन करून अभयारण्य 12 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.
Read More »Yearly Archives: 2020
सुकापूर येथे विकासकामांचे भूमिपूजन, दफनभूमीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपाली देवद ग्रामपंचायत हद्दीत सुकापूर परिसरात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार्या विकासकामांचे भूमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीमधून करण्यात आलेल्या लहान मुलांच्या दफनभूमीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) करण्यात आले.पनवेल तालुक्यात भारतीय …
Read More »मुंबई इंडियन्सचा ‘पंच’
आयपीएल-13चे पाचव्यांदा विजेतेपद दुबई : वृत्तसंस्थामुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दुबई येथे खेळल्या गेल्या आयपीएल-13च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवित एकतर्फी मात केली. मुंबईने दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला होता. हे आव्हान त्यांनी पाच गडी राखून पार केले.कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ …
Read More »बिहारमध्ये भाजपची भरारी
गतवेळेच्या तुलनेत 21 जागा वाढल्या पाटणा : वृत्तसंस्थाबिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित लोकशाही आघाडी (एनडीए)ने 125 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या. यंदा 74 जागी ‘कमळ’ फुलले आहे. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपने जबरदस्त यश …
Read More »अखेर अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थावास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला असून, इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. कोर्टाने तिघांचीही प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर तत्काळ सुटका करण्याचे …
Read More »आदिवासींना धान्य वाटप
स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनची दिवाळी भेट कर्जत : बातमीदार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील वारे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील सुमारे 70कुटुंबाना धान्य आणि मास्कचे वाटप करण्यात आले. करकुल व विकासवाडी या दोन आदिवासी वाड्यांमध्ये एकूण 70 कुटुंबे आहेत. …
Read More »दीपावलीसाठी रोहा बाजारपेठ सजली
कोरोनाच्या सावटामुळे तेजी नाही रोहे : प्रतिनिधी येथील बाजारपेठ दीपावलीच्या साहित्याने सजली आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असली तरी या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत तेजी नसल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोहा बाजारपेठेतील दुकाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्यांनी सजली आहेत. बाजारपेठेतील दुकाने आकाश कंदील, विद्युत तोरणे, फटाके आदी …
Read More »नाभिक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश मोरे
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज बांधवांची सभा सोमवारी (दि. 9) जनार्दन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वाकण येथील हॉटेल बाळाराम येथे झाली. या बैठकीत महाडचे दिनेश मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत उर्वरित कार्यकारिणीचीसुध्दा निवड करण्यात आली. त्यात कार्याध्यक्षपदी सोपान मोहिते (रोहा), उपाध्यक्ष विनोद पवार (उरण), मोहन चव्हाण …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस आजन्म कारावास
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन आणि तिला धमकावून तिच्यावर सहा वर्षे बलात्कार करणार्या आरोपीला येथील विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे. मोरेश्वर उर्फ नारायण गोविंद पेरेकर (रा. रेवस कोळीवाडा, ता. अलिबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही …
Read More »कंत्राटदार साजरी करणार काळी दिवाळी
थकीत देयके न दिल्यास काम बंद आंदोलन पाली : प्रतिनिधी कंत्राटदारांची थकीत देयके दिवाळीपूर्वी अदा केली नाही तर 25 नोव्हेंबरपासून स्थानिकस्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलूप लावून ठिय्या आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम व संबंधित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper