Breaking News

Yearly Archives: 2020

अर्णब गोस्वामी यांच्या भवितव्यासंदर्भात अलिबाग सत्र न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी

अलिबाग : प्रतिनिधीअलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज सोमवारी (दि. 9) उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने दिवसभराचे काम सायंकाळी उशिरा स्थगित केल्याने या संदर्भात मंगळवारी (दि. 10) पुन्हा सुनावणी …

Read More »

तळोजा रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग पूर्णपणे खुला भाजपच्या आंदोलनाला यश

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या आंदोलनाला यश आले असून, नागरिकांनी आभार मानले आहेत.तळोजा रेल्वे फाटकाजवळ वाहनचालकांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवा-पनवेल मार्गावर अनेक वेळा …

Read More »

ठाकरे सरकार आता कोणाला जेलमध्ये टाकणार?

माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सवाल अलिबाग : प्रतिनिधीवेतन न मिळाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) वाहक आणि चालक आत्महत्या करीत आहेत. याबाबत ठाकरे सरकार कोणाला जेलमध्ये टाकणार, असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत रायगड पोलिसांनी केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सोमवारी …

Read More »

कोशिश फाऊंडेशनतर्फे पोस्टर, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी आहेत.मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये तसेच 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे आणि 22 वर्षावरील अशा चार गटांमध्ये …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांचा आक्रोश

थकीत वेतनासाठी आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचार्‍यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेने सोमवारी (दि. 9) राज्यभर आक्रोश आंदोलन केले. या वेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अशातच राज्यामध्ये दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने …

Read More »

पनवेल : भाजप युवा कार्यकर्ते निलेश अरुणशेठ भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर जगदिश गायकवाड, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

शैक्षणिक फी कमी करा; रोह्यातील राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन

रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, अशी मागणी करीत सोमवारी (दि. 9) सकाळी येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांनी निवेदन दिले. स्कूलच्यावतीने हे निवेदन गणेश पवार यांनी  स्वीकारले. सरकारचे 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय फीबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसताना रोहे …

Read More »

पालीमध्ये पाणीटंचाई; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

पाली : प्रतिनिधी कोलाड पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाली (ता. सुधागड) मधील ग्रामस्थांना गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंबा नदीवर बलाप गावाजवळील उभारलेल्या केटी बंधार्‍यातून पाली शहराला पाणी पुरवठा केला जातो. केटी बंधार्‍याचे दरवाजे किंवा फळ्या बंद करुन अंबा नदीचे पाणी अडविले …

Read More »

नागोठणे-रोहे रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे एसटी बसेसचा मार्ग बदलावा लागला

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे – रोहे मार्गातील आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून चालणार्‍या एसटी बसेससाठी हा रस्ता बंद करून त्या वाकण- आमडोशी मार्गावरून चालवण्याची परिस्थिती एसटी महामंडळावर ओढवली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. नागोठणे-रोहे …

Read More »

दिवाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

पनवेल : वार्ताहर – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच सणांवर कोविडचे सावट आहे. यामुळे नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती आहे. भारतीय सणांमध्ये सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे, मात्र सध्या अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे कंदील, पणत्या …

Read More »