Breaking News

Monthly Archives: January 2021

पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे मुरूडमध्ये वाटप

मुरूड : प्रतिनिधी येथील स्टार फाऊंडेशनतर्फे मुरूड शहरातील सुमारे 330 कुटुंबांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान जनआरोग्य योजना केंद्र शासनाकडून राबवली जात असून, या योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. स्टार फाऊंडेशनने  संगणकाचा वापर करून ज्यांची नावे या योजनेत आली …

Read More »

पेणमध्ये बर्ड फ्लूमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क

पेण : प्रतिनिधी पशुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील बंदिस्त 562 कोंबड्यांपैकी पाच कोंबड्यांना ’बर्ड फ्लू‘ ची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने अंतोरे फाटा परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे …

Read More »

राम मंदिरासाठी यथाशक्ती निधी द्या

जैन मुनी विजय महाराज यांचे खोपोलीत आवाहन खोपोली : प्रतिनिधी समाजात वाढलेला व्यभिचार, लुटारु प्रवृत्ती, वाईट मार्गाने संपत्ती कमविण्याचा मोह या सर्व बाबी नष्ट करायच्या असतील तर, मर्यादा पुरुषोत्तम, संयमी व दुसर्‍याबद्दल आदर असणार्‍या प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणे काळाची गरज आहे, याकरीता प्रत्येक भारतीयाने यथा शक्ती निधी दिला …

Read More »

पती-पत्नीमधील वाद वाढले!; वर्षभरात 633 तक्रारी; 151 प्रकरणांत समुपदेशन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था …

Read More »

भाजप सोशल मीडिया सेलची कोकण-ठाणे विभागीय बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप सोशल मीडिया सेल कोकण-ठाणे विभागीय पदाधिकार्‍यांची बैठक प्रदेश संयोजक प्रवीण अलाई, सहसंयोजक समीर गुरव, आयटी सेल प्रदेश प्रमुख सतिश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 20) पनवेलमध्ये झाली.या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले.पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या …

Read More »

दिलासादायक! नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी; मृत्यूदरातही घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. शून्य मृत्यूदराचे उद्दिष्टही दृष्टिपथास येऊ लागले आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारीही 1.57 एवढी कमी झाली. शहरात 12 मार्च 2020ला पहिला रुग्ण आढळला. मार्चमध्ये फक्त 10 रुग्ण होते. त्यापैकी एकाचा …

Read More »

धान्य, भाज्या ‘मातोश्री’त नेऊन विकायच्या का?

खासदार नारायण राणे कडाडले मुंबई : प्रतिनिधीनव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात 23, 24, 25 जानेवारी रोजी होणार्‍या शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे. हे आंदोलन राजकीय आहे. वर्षभरात शेतकर्‍यांच्या हिताचे एकही काम …

Read More »

राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, या संदर्भात बुधवारी (दि. 20) होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले …

Read More »

महाविकास आघाडीत बिघाडी?; नवी मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी …

Read More »

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

पेणमधील कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह अलिबाग : प्रतिनिधीबर्ड फ्लूने रायगड जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पेण येथील सरकारी कुक्कुटपालन कृत्रिम रेतन केंद्रातीलच कोंबड्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बर्ड फ्लूचे सावट पोपटीवरदेखील पसरले आहे.  रब्बी हंगाम सुरू झाला की रायगडकरांना पोपटीचे वेध लागतात. वालाच्या किंवा इतर ताज्या …

Read More »