Breaking News

Monthly Archives: January 2021

सिराजने खरेदी केली बीएमडब्ल्यू

हैदराबाद : वृत्तसंस्थाअनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा बिग्रेडने ऑस्ट्रेलियात कमाल केली. यामध्ये मोहम्मद सिराजनेही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर सिराजने बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली आहे.ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍याला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियातच थांबून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक …

Read More »

…तर विराटने कर्णधारपद सोडावे!

इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी लंडन : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाही आणि त्यामुळे आता कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवण्याची मागणी जोर धरत आहे. त्यात आता इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसार याने …

Read More »

पनवेलचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार 200 बेडचे

पनवेल : प्रतिनिधीपनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय 200 बेडचे होणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात आयसीयूचे सहा बेड, तर डायलेसिसचे चार बेड लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 22) बोलावलेल्या बैठकीत देण्यात आली.महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कामाच्या लवकर पूर्ततेसाठी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

एकवी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधीवाशी येथील एकवी एअर ऑर्गनायझेशन प्रा. लि. या पायलटचे प्रशिक्षण देणार्‍या कंपनीचे उद्घाटन  शुक्रवारी (दि. 22) आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  माजी खासदार लोकनेते …

Read More »

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधीराज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.महाराष्ट्रात 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी …

Read More »

देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!

सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे, परंतु एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आणि सीमेवरील तणावाची स्थिती हाताळण्यात यशस्वी ठरलेले मोदी यांचे नाव देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून कार्वी इनसाइट्स’च्या मूड ऑफ द …

Read More »

वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने वाढीव देयके न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता वीज ग्राहकांना वापरत्या विजेची देयके आकारून त्यांना थकबाकीची वीज देयके भरण्यास सवलत देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि त्यातून उद्भवणार्‍या परिस्थितीची जबाबदारी आपली …

Read More »

पटोलेंचा स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : प्रतिनिधीराज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून, बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे,  मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. …

Read More »

रोडपालीत उद्यानाचे लोकार्पण

पनवेल, कळंबोली : प्रतिनिधीशहरी पट्टा, गावे असोत की सिडको वसाहती पनवेल महापालिका आपल्या हद्दीतील सगळ्या भागांसाठी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ, सबका विकास हा मंत्र घेऊनच भारतीय जनता पक्ष पनवेल महापालिकेत काम करीत असल्याचे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोडपाली येथे केले. …

Read More »

‘आत्मनिर्भर भारत’चा टीम इंडियाकडून वस्तुपाठ -पंतप्रधान मोदी

दिसपूर : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 22) आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या 18व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल …

Read More »