ब्रिस्बेन : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारी (दि. 15) ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळविण्यात येत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना उभय संघांनी जिंकला असून, एक सामना अनिर्णीत राहिला असल्याने उरलेला सामन्यात मालिकेचा निकाल लागतो की हाही सामना अनिर्णीत होऊन मालिका बरोबरीत सुटते …
Read More »Monthly Archives: January 2021
सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्याकडून खारघरमधील उद्याने, मैदानांची पाहणी
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील विविध उद्याने आणि मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. या उद्यान व मैदानांमध्ये विविध सुविधा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 13) खारघरमधील उद्याने आणि मैदानांची पाहणी केली. या वेळी स्थायी …
Read More »उरणच्या जासईमध्ये 150 कोंबड्या दगावल्या
उरण : वार्ताहर सध्या राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असताना उरण तालुक्यातील जासई येथे 150 कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचे पंचनामे करून नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील प्रदीप घरत यांच्या 150 कोंबड्या रविवार ते …
Read More »मनसे कार्यकर्ते, काँग्रेस पदाधिकार्याचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे कळंबोली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी (दि. 12) भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशकर्त्यांचे प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रचार अभियान युवा …
Read More »पनवेल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भगवान नामा पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राघो पाटील उपस्थित होते.
Read More »‘दिबां’ना अभिवादन पनवेल : कष्टकरी, शेतकरी, भूमिपुत्रांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांना जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘दिबां’च्या संग्राम निवासस्थानी जाऊन विनम्र अभिवादन केले.
Read More »धनंजय मुंडे राजीनामा द्या!; सर्व स्तरांतून मागणी; भाजप आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि तिच्याच बहिणीसोबत मुंडे यांच्या असलेल्या संबंधांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींप्रकरणी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भाजपनेही ही मागणी लावून धरली आहे. …
Read More »गावांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त उरणमध्ये प्रचार सभा
उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात परिवर्तन घडविले. एकीकडे त्यांनी भ्रष्टाचार करणार्यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरीकडे विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावांच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मॉक ड्रील
नागोठणे : प्रतिनिधी भंडारा येथे नुकतीच घडलेली भयावह दुर्घटना येथे पुन्हा घडू नये, या भावनेतून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी येथील आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. डॉ. म्हात्रे यांनी या वेळी केंद्रातील कर्मचार्यांच्या सहभागातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक सादर केली. केंद्रात आपत्ती …
Read More »मुरुडमध्ये डायलिसिस रुग्णांकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू
मुरुड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या येथील डायलिसिस सेंटरमध्ये येणार्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा शुभारंभ नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा लागू झाल्याने आता संस्थेच्या सेंटरमध्ये डायलिसिससाठी माफक खर्च येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper