Breaking News

Monthly Archives: January 2021

गटारात काम करणार्याचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी           चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्या खाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यास गेलेल्या जगन पांडुरंग पवार (वय 30) यांचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्याखाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यासाठी …

Read More »

कोरोना काळात भारताकडून उच्च संस्कृतीचे दर्शन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; विशेषांकाचे प्रकाशन

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीमध्ये संस्कृती, प्रकृती आणि विकृती हे होत असताना भारताने महामारीवर रामबाण हायड्रोक्लोरीन गोळी देऊन जगाला आपली संस्कृती उच्च असल्याचे दाखवून दिले, असे उद्गार भाजपचेे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे काढले. खालापूर तालुका देशमुख मराठा समाजाच्या वतीने आणि सूर्यकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून …

Read More »

पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटच्या उद्योग श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा

पनवेल : वार्ताहर पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणार्‍या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्योग श्री या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन दिवसांच्या धार्मिक विधीनंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली. पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर …

Read More »

तळोजा येथील रोजगार मेळाव्याला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने व एज्यु-टेक कोचिंग क्लासेस, व्हेरल इव्हेंट्स आणि एचआर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तळोजा फेज 1 येथे विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो जणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने …

Read More »

सिडकोतर्फे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील खारघर, कळंबोली आणि सानपाडा नोडमधील निवासी आणि वाणिज्यिक (आर+सी) वापराचे सहा भूखंड विक्रीकरिता उपबल्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक नोडमधील दोन याप्रमाणे सहा भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. खारघर हा नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड असून रेल्वे, रस्ते आणि प्रस्तावित मेट्रो स्थानक …

Read More »

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर -पवार

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर …

Read More »

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

उरण : वार्ताहर राजमाता जिजाऊ समिती आयोजित जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा 2021च्या माध्यमातून मंगळवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ, समाधीस्थळ पाचाड, रायगड येथे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी राजमाता जिजाऊंची माहिती व जिजाऊ पराक्रम सांगून आलेल्या भगिनींना स्त्री शक्तीची खरी ओळख करून देण्यात आली. …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; प्रशासन सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 10 …

Read More »

खारघरमध्ये पाच लाखांचे चरस जप्त

  गुन्ह्यांतील वाहने, मोबाइल हस्तगत; नवी मुंबई पोलिसांची कारवाई कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नवी मुंबई शहरामध्ये नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत अमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असून या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई …

Read More »

गुड न्यूज! कोविशिल्ड लस रायगड जिल्ह्यात दाखल

अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बुधवारी (दि. 13) रात्री रायगड जिल्ह्यात दाखल झाली. लसीच्या नऊ हजार 700 कुप्या जिल्ह्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. …

Read More »