Breaking News

Monthly Archives: January 2021

भाजप नेते संदीप पाटील यांच्या दणक्याने सिडको प्रशासन वठणीवर

पनवेल : वार्ताहर भाजप नेते व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या दणक्याने  सिडको प्रशासन वठणीवर आले आहे. गटारांचे रुंदीकरण व सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांचे विस्तारीकरण कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन सिडकोने दिले आहे. संदीप पाटील यांनी यासंदर्भात सिडकोच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. सिडको प्रशासनाच्या …

Read More »

जासई विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन, महिला मुक्ती दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव अध्यक्ष सल्लागार समितीचे सदस्य यशवंत …

Read More »

‘सावित्रीबाई फुलेंमुळेच स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला’

पनवेल : प्रतिनिधी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज अनेक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले. रविवारी (दि. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते मनोगत व्यक्त करीत होते. महाराष्ट्र …

Read More »

शेकाप, काँग्रेसच्या पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत शेकाप व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन या पदाधिकार्‍यांचे पक्षात …

Read More »

नववर्षानिमित्त रोपवाटिका व्यावसायिकांना सुगीचे दिवस

रोपांची विक्री वाढली पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाचा फटका अनेक लहान मोठ्या उद्योग-व्यवसायांना बसला.  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच रोपवाटिकेतील रोपांची विक्री थांबली होती. परिणामी कोट्यवधींचे नुकसानही सहन करावे लागले, मात्र सध्या विकसकांची सुरू झालेली कामे तसेच नाताळच्या सुट्यांमध्ये पर्यटकांची रोपांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पाली सुधागडात रोपवाटिका व्यवसाय तेजीत आला …

Read More »

महेश साळुंखे यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन

पेण ः प्रतिनिधी पेणमध्ये आदिवासी कुटुंबातील चुमकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची निर्दयी घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 3) स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही …

Read More »

रिलायन्सविरोधातील आंदोलन सुरूच

प्रकल्पग्रस्त मागण्यांवर ठाम नागोठणे ः प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत रिलायन्स कंपनीकडून काही प्रस्ताव आंदोलनकर्त्यांसमोर ठेवण्यात आले, मात्र सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळालीच पाहिजे ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी रविवारी (दि. 3) 38व्या दिवशीही आंदोलन …

Read More »

पेणमध्ये ऑफिस टू गिगा फायबर नेटवर्कचा शुभारंभ

पेण : प्रतिनिधी हायस्पीड नेटवर्कच्या वतीने पेणमध्ये ऑफिस टू गिगा फायबर नेटवर्क सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवृत्ती पाटील यांनी या वेळी केले. या नेटवर्कचा स्पीड 14 ते 100 एमबीपीएस असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही …

Read More »

नाभिक समाज सामाजिक संस्थेचे उपोषण स्थगित

तहसीलदारांचे कारवाईचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून उपोषण सुरू करण्यात आले होते, मात्र …

Read More »

रस्त्यांच्या मधोमध विजेचे खांब

कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत,त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब हि समस्या. यावर महावितरण कंपनी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची करोडो रुपयांची कामे करणारी यंत्रणा देखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात मागील …

Read More »