माणगाव : प्रतिनिधीमाणगाव येथे तीनबत्ती नाका मैदानावर आय्यान क्रिकेट क्लबतर्फे आय्यान चषकाचे आयोजन दि. 29, 30 व 31 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव व रॉयल क्रिकेट क्लब बोर्ली संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात यजमान आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाने बाजी मारून प्रथम क्रमांकाचे रोख …
Read More »Monthly Archives: January 2021
कसोटीसाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश
मेलबर्न ः वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात टी. नटराजनचा समावेश करण्यात आला आहे. दुसर्या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली होती. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हापासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. …
Read More »उर्वरित कसोटींसाठी रोहित की अजिंक्य?
बीसीसीआयचा अजिंक्यच्या नावाला दुजोरा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलिया दौर्यातून माघार घेतल्याचे अखेर बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 1) जाहीर केले. पहिल्या कसोटीत शमी, तर दुसर्या कसोटीत उमेश दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दोघे ऑस्ट्रेलिया दौर्यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण याबाबत …
Read More »थेरोंडा समुद्रकिनारी पोलिसावर हल्ला
दोघा व्यावसायिकांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थेरोंडा समुद्र किनारी उभारलेल्या बीच कॅम्पींग व्यावसायिकांनी स्पीकर वाजविण्यास मनाई करणार्या पोलिसावर हल्ला केला. रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरोंडा समुद्रालगत हरेश किशोर मारकू व शाम हरिश्चंद्र मारकू (रा. खंडेरावपाडा) यांनी बीच कॅम्पींग व्यवसाय सुरू …
Read More »प्रवासी शेड दुरुस्तीकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष
मुरुड : प्रतिनिधी चक्री वादळात मुरूड एसटी आगारातील प्रवासी शेड व आरक्षण कक्षाच्या इमारतीचे छप्पर उडून गेले होते. मात्र या छप्परावर पत्रे बसवण्याकडे विभाग नियंत्रकांकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील एसटी कर्मचार्यांना इमारतीबाहेर बसून कामकाज करावे लागत आहे तर प्रवाशांना कडक उन्हात बसून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. 15 दिवसात …
Read More »‘…तर माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, तर ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू, असे काँग्रेस (आय) चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार (माणगाव) यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार …
Read More »रसायनीत दुकानाला आग
एकाचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीमधील मोहोपाडा येथील दुकानाला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोघेजण होरपळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहोपाडा येथील मरिआई मंदिराजवळ एका दुकानाच्या गाळ्यात कापसाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये गोपाळ …
Read More »अत्याचारी नराधमाला ‘शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसांत फाशी द्या
शूरनारी प्रतिष्ठानतर्फे ट्विटर मोहिमेद्वारे मागणी; नागोठणे पोलीस ठाण्यात दिले निवेदन नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पांचोळा आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणार्या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसात फाशी देण्याची मागणी येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी ट्वीटर मोहिमेद्वारे करण्यात आली असून तसे निवेदन शुक्रवारी (दि. 1) …
Read More »पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले!
संचार बंदी दूर होताच मुरुड येथील काशीद व मुरुड समुद्र किनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळत आहे.मुंबई पासून 165 किलोमीटरवर मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोम्बवली, विरार येथील सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.मुरुड तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत.या विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देऊन पर्यटनाचा आनंद …
Read More »शिंदे शिक्षक दाम्पत्य राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
माणगाव : प्रतिनिधी कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनने शंकर दत्ताराम शिंदे (प्राथमिक शाळा-देगाव) आणि उर्मिला शंकर शिंदे (प्राथमिक शाळा-पानोसे) या शिक्षक दाम्पत्याला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विशेष कामगिरी बजावणार्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper