महावितरणने केला पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित कर्जत ः बातमीदार ग्रामीण भागातील रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी अंधार दूर करणारे पथदिवे गेले काही दिवस बंद आहेत. रायगड जिल्हा परिषदेने त्या पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी रक्कम भरली नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. दरम्यान, नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्यांवरून राजकारण तापले असून कर्जत तालुक्यातील …
Read More »Monthly Archives: March 2021
भारीट पक्ष्यांचा कोकणातील मुक्काम वाढला
पाली ः प्रतिनिधी हिवाळ्यात पूर्व युरोप व पूर्व इराण देशांतून जवळपास 7000 किमीचा प्रवास करून काळ्या डोक्याचे भारीट पक्षी कोकणात येतात आणि हिवाळा संपला की आपल्या मूळ ठिकाणाकडे हळूहळू परततात, मात्र उन्हाळा सुरू झाला तरीही हे पक्षी थव्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी वावरताना पक्षी अभ्यासकांना दिसत आहेत. मुबलक खाद्य व पोषक …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघातांमध्ये दोघे जखमी
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री (दि. 21) मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात घडले. पहिल्या अपघातात टँकरचालक पुण्याहून मुंबईकडे जात असताना टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर महामार्गावर पलटी झाला. ही घटना खोपोली एक्झिटजवळ रात्री 9.30च्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातात वाहनचालक बचावला. कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यामुळे मोठ्या …
Read More »श्रमिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कर्जत ः बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेरळमधील श्रमिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ भाजपच्या वतीने श्रमिक आणि कामगार वर्गातील 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथील जेनी ट्युलिप शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमाला भारतीय …
Read More »महाराष्ट्रात प्रथमच होणार गिधाडांची गणना
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक पद्धतीने गिधाड संवर्धनाचा प्रकल्प राबविणारे रायगड जिल्ह्यातील पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेमार्फत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या गिधाड संवर्धन व संशोधन प्रकल्पांतर्गत 21 मार्च या जागतिक वनदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड (पाली) या तालुक्यांतून गिधाडांची गणना सुरू आहे, मात्र या कार्यात …
Read More »वर्षपूर्तीचा धडा
आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारणाचे डावपेच खुंटीला टांगून ज्या-ज्या राज्यांनी केंद्र सरकारच्या साथीने कोरोनाशी मुकाबला केला, त्या राज्यांमध्ये कोरोनाचा विषाणू पुरता नमला आहे. दुर्दैवाने हा धडा महाराष्ट्र शिकलाच नाही, असे म्हणावे लागेल. कारण सार्या देशात कोरोना नियंत्रणात असताना महाराष्ट्रात मात्र रुग्णसंख्येचा स्फोट झालेला दिसतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उतरणीला लागलेली ही …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -प्रकाश आंबेडकर
मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर हे सोमवारी (दि. 22) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.महाराष्ट्रात सध्या राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे …
Read More »सीकेटी विद्यालयातर्फे होणार धान्य आणि पुस्तकांचे वाटप
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट अंतर्गत धान्य आणि पुस्तके वाटप उपक्रमांचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात …
Read More »खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात
नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप राणा यांनी केला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात स्वतःपेक्षा जनतेची काळजी घेत त्यांना सर्वतोपरी व सढळ हस्ते मदत करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.मागील वर्षात संपूर्ण जगात कोरोना या वैश्विक …
Read More »