खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 6 मधील सावन हायनेस सोसायटी समोरील रस्त्यावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सम विषम नियमांची अंमलबजावणी नियमावली 8 एप्रिलपासून लागु केली आहे. त्याठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी, तसेच वाहतुक करताना निर्माण होणार्या अडथळ्यामुळे नवी मुंबई वाहतुकीचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी यासंदर्भात अधिसूचना पारित केली …
Read More »Monthly Archives: April 2021
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची आदिवासीपाड्यात जनजागृती करा
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मागणी पनवेल : वार्ताहर मार्च महिन्यापासून देशात सर्व ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला आहे. पनवेल तालुक्यातही ही मोहीम सुरू आहे, असे असले तरी दुर्गम भागात राहणार्या आदिवासी वाड्या आणि पाड्यांवर याबाबत माहिती आणि जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे त्यांना जमत नाही. …
Read More »उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; तीन महिन्यांत 1350 जणांना दंश
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सुमारे 1350 हुन अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा एक आगळावेगळा विक्रम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उरण तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या चार दिवसात 51 जणांना कुत्र्यांनी चावा-घेऊन गंभीर जखमी केले आहे. …
Read More »पोळी-भाजी केंद्र व्यावसायिक चिंतेत
राज्य शासनाने मदत करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे हॉटेल्स, कॅटरर्स बंद झाली, परंतु या ठिकाणी पोळी भाकरी पुरविणार्या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. उदर्निवाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे शहरातून मूळगावी स्थलांतरित झाली असून उपासमार थांबण्यासाठी राज्य …
Read More »लॉकडाऊनमधून व्यापार्यांना शिथिलता द्यावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे पेण तहसीदारांना निवेदन
पेण : प्रतिनिधी कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान होत असून या निर्बंधातून त्यांना दोन तास शिथिलता द्यावी, अशी मागणाी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेणच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. मागील लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सावरून व्यापारी वर्गाने लग्नसराई, यात्रा-उत्सवासाठी मालाचा साठा केला होता. मात्र कोविड …
Read More »दुकाने बंद, मात्र वर्दळ सुरू राज्य शासनाचा संभ्रमित निर्णय
उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचे नियत गोंधळ निर्माण करणारे असल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आलेली असली तरी फेरीवाल्यांच्या गाड्या, नागरिकांची वर्दळ सुरू आहे. उरणमध्येही असेच वातावरण पहावयास मिळत आहे. पोलिस व नगर परिषद प्रशासनाने शहरातील दुकाने सक्तीने बंद केली असली, तरी रस्त्या …
Read More »सिडकोचे भूखंड होणार ग्राहकांच्या पसंतीने विकसित; अनोखी जॅकप्लॉट योजना
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना आपल्या हक्काचे व पसंतीचे घर अथवा वाणिज्यिक बांधकाम, ते ही आपल्या उत्तम सोयी-सुविधांनी परिपूर्ण भूखंडावर उभारण्याची एक अनोखी जॅकप्लॉट योजना आणण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सिडकोने नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून …
Read More »पनवेलमध्ये परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये प्रवासास परवानगी
पनवेल : प्रतिनिधी स्पर्धा परिक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी ज्या परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊन (शनिवार-रविवार लॉकडाऊन) कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परिक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल, तसेच प्रत्येक परीक्षार्थींच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 …
Read More »लॉकडाऊनविरोधात व्यापार्यांचे आंदोलन; पनवेल, खांदा कॉलनीत आघाडी सरकारचा तीव्र निषेध
पनवेल : प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारने घातला असल्याने तसेच वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने व्यापार्यांसह नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्या अनुषंगाने आज खांदा कॉलनी …
Read More »शुक्रवारपासून आयपीएलचा रनसंग्राम
मुंबई-बंगळुरू संघांमध्ये सलामीची लढत चेन्नई ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलच्या 14व्या हंगामाला शुक्रवार (दि. 9)पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील सलामीची लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper