मुंबई ः प्रतिनिधीप्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी …
Read More »Monthly Archives: April 2021
पनवेल महापालिका हद्दीत सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीवजा सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणीवजा सूचना केली आहे.या …
Read More »महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली
वाझेंच्या लेटरबॉम्बवरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थानिलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची …
Read More »केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रात कोरोना परिस्थितीचा आढावा
अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुरुवारी (दि. 8) सुपर स्पेशालिटी रुग्णालयस्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश होता. कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास तिसर्या …
Read More »टी-20 वर्ल्डकपबाबत आयसीसीचा बॅकअप प्लान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह दुबई ः वृत्तसंस्थाभारतात यंदाच्या वर्षाच्या शेवटाला आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे, पण देशात सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने करण्यात आलेले विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) चिंता वाढवणारे …
Read More »उसेन बोल्टचा ‘आरसीबी’ला पाठिंबा
चेन्नई ः वृत्तसंस्थाआयपीएलसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहतेदेखील उत्सुक आहे. या वर्षी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला एक नवा चाहता मिळाला आहे. जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा माजी खेळाडू उसेन बोल्टने या वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार्या संघाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.बोल्टने आरसीबीची जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहिल्या …
Read More »भारतीय हॉकी संघाची सरावात अर्जेंटिनावर मात
ब्युनॉस आयर्स ः वृत्तसंस्थाभारतीय पुरुष हॉकी संघाने विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करीत अर्जेंटिना हॉकी दौर्यातील पहिल्या सराव सामन्यात आश्वासक सुरुवात केली.या सामन्यात भारताकडून निळकंठ शर्मा (16व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (28व्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (33व्या मिनिटाला) आणि वरुण कुमार (47व्या मिनिटाला) यांनी गोल करीत विजयात योगदान दिले. लिआंड्रो …
Read More »सराव सामन्यात दिनेश कार्तिकचे झंझावाती अर्धशतक
कोलकाता ः वृत्तसंस्थाआयपीएलसाठी गेल्या काही दिवसांपासून आठही संघातील खेळाडू जोरदार सराव करीत आहेत. यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चादेखील समावेश आहे. केकेआरचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने सराव सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. संघाने कार्तिकच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.कोलकाता संघाने खेळाडूंचे दोन संघ केले. या दोन संघांतील अभ्यास सत्रात …
Read More »सर्वोच्च चपराक
माजी गृहमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणाने आपल्या विरुद्धची चौकशी व्हावी या सद्हेतूने (?) आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु विरोधाभास एवढा की निष्पक्षपाती चौकशीचे स्वागत करणारे हेच माजी गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयात धावले ते चौकशी रद्द करण्याची मागणी करण्यासाठी. नेमके काय खरे मानायचे? आपल्या विरुद्धची चौकशी निष्पक्षपातीपणाने व्हावी हा त्यांचा खरोखर हेतू …
Read More »कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय माणूससुद्धा कोरोना उपचाराचा खर्च करू शकत नाही. या बाबींचा विचार करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कोकण …
Read More »