गुरव समाज नेते बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गुरव समाजाचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर …
Read More »Monthly Archives: April 2021
भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहणार -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते
मुरुड : प्रतिनिधी सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अॅड. …
Read More »महाडमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम
महाड : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही विचार न करता जनतेवर लादलेल्या अन्यायकारक लॉकडाऊन विरोधात महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 8) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील छोटे व्यावसायीक आणि व्यापार्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन अन्यायकारक असून, त्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ …
Read More »लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक
कर्जतमध्ये प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी राज्य शासनाने लावलेले लॉकडाऊनसदृश निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप व्यापारी आणि उद्योग सेलच्या वतीने त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. मात्र कृषी …
Read More »गरजूंना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजर्या करण्यात येणार्या कार्यक्रमाअंतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे रोज 70 गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. गुरुवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत रिक्षासेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची …
Read More »उरणमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण : वार्ताहर देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमांचे पालन आणि कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उरणमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. उरणमध्ये आतापर्यंत 3930 जणांचे लसीकरण झालेले असून दररोज 100 जणांना डोस …
Read More »खारघरमध्ये पार्लरवर कारवाई; मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे उघड
पनवेल : वार्ताहर मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्या जाणार्या खारघर सेक्टर-3 मधील शगुन फॅमिली स्पावर खारघर पोलिसांनी छापा मारून मसाज पार्लर चालक मालक व मॅनेजर या तिघांवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन मुलींनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खारघर …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियमावली; कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांवर कोरोना प्रतिबंधक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांनी कोरोना नियंत्रण करणार्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या पदाधिकारी-सदस्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अनेक वेळेला सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील कोरोना रुग्ण बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळत आहेत. या …
Read More »रोह्यात 24 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
धाटाव : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या रोहा नगर परिषद हद्दीतील 24 व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रोहा नगर परिषद अत्यावश्यक सेवेखाली काही दुकाने बिनधास्त सुरु आहेत, काही दुकानदार मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देत आहेत. मिनी लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या व्यापार्यांवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाने दडांत्मक …
Read More »उन्हाच्या काहिलीने माठाची मागणी वाढली
माणगावात राजस्थानी माठ दाखल माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा 37 अंशपार झाला आहे. वाढणार्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर माडक्यातील गारेगार पाणी हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे असते. उन्हाळ्यात सर्वसामान्यांचा फ्रिज म्हणजेच माठ. या माठांना चांगली मागणी असते. ही बाब लक्षात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper