Breaking News

Monthly Archives: April 2021

सिडकोकडून घरांचे हफ्ते भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणार्‍या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील …

Read More »

लसीकरण नोंदणीला मोठा प्रतिसाद; कोविन अॅणपवर पहिल्या एका तासात 18 वर्षांवरील 35 लाख जणांची नोंदणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याला 1 मेपासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया गुरुवार (दि. 28) पासून सुरू झाली असून लसीकरण नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या एका तासात …

Read More »

पेण येथे 800 खाटांचे कोविड सेंटर

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश; चार रुग्णवाहिकाही देणार पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन   आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यासाठी मोठे कोविड सेंटर उभारण्याकरिता चाचपणी केली होती. त्याला यश आले असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या ट्रामा सेंटरमध्ये 800 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात  येणार असून चार रुग्णवाहिकाही देणार …

Read More »

कर्जत जलशुद्धिकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ कोरोना विषयक नियमांचे पालन करून ठराविक लोकांच्या उपस्थित करण्यात आला. कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राला सुमारे 18-20 वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या केंद्रात दुरुस्ती व सुधारात्मक कामे करणे गरजेचे होते. त्यापैकी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल …

Read More »

लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र कडकडीत उन्हात सुधागड तालुक्यात वाळवण संस्कृती मोठ्या प्रमाणावर टिकवली जात आहे. सध्या बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे यासारख्या वाळवणाच्या पदार्थांसह लोणची व मसाले तयार केले जातांना दिसत आहे, मात्र त्यासाठी मात्र शेजारी व …

Read More »

आरआयए लसीकरण केंद्राचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही द्यावा

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांची मागणी धाटाव : प्रतिनिधी येथील एमआयडीसीमधील रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन (आरआयए) सभागृहात कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप युवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी केली आहे. रोहे शहरात लस घेण्यासाठी होणारी …

Read More »

वादाचे ‘मॉडेल’ ठरू पाहणारी लोहारे प्राथमिक शाळा

ग्रामस्थ, ग्रामपंचायत, कार्यकर्ते, सत्ताधारी, अधिकारी, सरकार व अपयशी ठरणार्‍या घोषणा व योजनांसंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक उदाहरणांत पोलादपूर तालुक्यातील मॉडेल म्हणून निवड झालेल्या लोहारे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा समावेश होऊघातला आहे. 6 जुलै 2017 रोजी पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्येच्या लोहारे प्राथमिक शाळेत पाऊल टाकताच सकाळच्या प्रार्थनेसोबतचे ’मी सिद्ध …

Read More »

लसलसते राजकारण

वय वर्षे 18च्या वरील व 45च्या अलीकडील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे निश्चितच स्वागत केले पाहिजे, परंतु हे स्वागत जरा जपूनच करावे लागेल असे दिसते. निर्णय नि:संशय स्वागतार्ह आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वीदेखील महाविकास आघाडीने अनेक घोषणा …

Read More »

तक्का, कामोठ्यात लसीकरण केंद्र सुरू करा!

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी तक्का मराठी शाळा क्रमांक 11 येथे, तसेच कामोठे सेक्टर 21 येथील समाजमंदिर येथे नव्याने कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून पनवेलमधील एक कोटीच्या विकासकामांना मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून 2515 लेखाशीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रातील वाकडी ते दूंदरे रस्ता डांबरीकरण करणे (ओडीआर-खर्च 20 लाख रुपये), कोळवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), वांगणी …

Read More »