Breaking News

Monthly Archives: April 2021

तेलाच्या अपहारप्रकरणी दोघे अटकेत; माल जप्त

पनवेल : वार्ताहर तेलाची लाखो रुपयांची ऑर्डर देवून त्यानंतर तेल ताब्यात घेऊन ऑर्डरच्या बिलाचे पैसे न देता पळ काढणार्‍या टोळीपैकी दोघांना तुर्भे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे अशा प्रकारचे फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. आरोपी मुकेश पटेल (33 रा. कामोठे) व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीला चार लाख रुपये …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

10 दिवसांत 5,292 रुग्ण झाले बरे पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज कोरोनाबाधित रुग्ण हे पाचशेचा आकडा पार करत आहे. ही परिस्थिती भयावह असली तरी पालिका क्षेत्रातील रुग्ण बरे होणार्‍यांची संख्यादेखील दिवसाला पाचशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांत पाच हजार 292 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले …

Read More »

सीएफआयतर्फे विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य

पेण : प्रतिनिधी चिल्ड्रन्स फ्यूचर इंडिया (सीएफआय) तर्फे प्रकल्प प्रमुख डॉ. किशोर देशमुख यांच्या पुढाकाराने प्रतिपालीत 89 विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी चालू शैक्षणिक वर्षात सहा लाख 65 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. सीएफआय ही संस्था मुलांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत आहे. संस्थेने आतापर्यंत आठ हजाराहून अधिक प्रतिपालीत विद्यार्थ्यांना मदत केली …

Read More »

लॉकडाऊनमुळे श्रीवर्धनमधील बुरूड व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर

श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावरती असल्याचे पाहायला मिळत आहे. सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे श्रीवर्धन तालुक्यातील बुरूड व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरुड समाजाने वीणलेल्या टोपल्या, परड्या, रोवळ्या, सुपे, कोंबड्यांचे खुराडे, भाताचे कणगे याला मोठी मागणी असते. रोवळीचा उपयोग प्रामुख्याने लग्न समारंभामध्ये तांदूळ धुण्यासाठी केला …

Read More »

खालापूर पोलीस ठाण्याने घेतली पाच गावे दत्तक

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाकाळात विशेष दक्षता घेण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी पाच गावे दत्तक घेऊन नवा उपक्रम सुरू केला असून, त्याचा शुभारंभ बुधवारी (दि. 28) माडप गावापासून करण्यात आला. कोरोनाला अटकाव करण्याच्या हेतुने खालापूर पोलीस ठाण्याने तालुक्यातील माडप, नारंगी, भिलवले,   शिरवलीवाडी आणि केळवली ही गावे दत्तक घेतली …

Read More »

राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक बाळकृष्ण विष्णु ऊर्फ प्रमोद कोनकर यांच्यासह विविध विभागातील दहा पत्रकारांना दर्पण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या 28व्या सन 2020च्या …

Read More »

लसीकरण केंद्रात भाजपचा नोंदणी कक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये अडकला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम चालू झालेली आहे. येणार्‍या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेलमधील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी व नोंदणी …

Read More »

पनवेल महापालिकेचे भरारी पथक ‘त्या’ कोविड रुग्णालयांवर करणार कारवाई

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने कोविड रुग्णालये शासनाने दिलेले नियम पाळत आहेत की नाही. यावर लक्ष ठेवण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण, व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स अशा गोष्टींवर हे पथक लक्ष ठेवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेने कोविड 19च्या उपचाराकरिता 44 खासगी रुग्णालयांना …

Read More »

उरण तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई नाका ते ऐकटघर धुतूम व दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यांवर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.दोन्ही रस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जासई नाका ते ऐकटघर धुतूम …

Read More »

कोविडमान्य रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील खासगी कोविड-19 हॉस्पिटलकरिता परवानगी देण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे, तसेच निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना …

Read More »