Breaking News

Monthly Archives: May 2021

भाजपतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुतीच्या केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सेवा हीच संघटना हा भाजपचा मूलमंत्र लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात सेवाकार्य दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका …

Read More »

संचारबंदी काळातील उल्लंघन; न्हावाशेवा पोलिसांकडून लाखोंची दंडवसुली

उरण : प्रतिनिधी न्हावाशेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीदरम्यान शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍या 4398 व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्याकडून पाच लाख 73 हजार 280 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही माहिती न्हावाशेवाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे. संचारबंदी काळात नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी न्हावाशेवा पोलिसांनी गस्ती …

Read More »

जहाजांवर काम करणार्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनकडून पुन्हा एकदा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी (जहाजांवर काम करणारे) कोविड लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. यूनियनकडून माहिती घेतली असता समजते, देशातील बहुतांश राज्य सरकारांनी, केंद्र सरकार व डीजी शिप्पिंगकडून निर्देश देवून सुद्धा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड लसीकरणाला प्राधान्य दिलेले नाही व …

Read More »

एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सौजन्याने वागावे -दौंडकर

पनवेल : वार्ताहर सर्वच समाजातील लोकांनी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांशी सौजन्याने वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी त्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या घेतलेल्या एकत्रित बैठकीत मार्गदर्शन करताना केले. या वेळी बोलताना …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त गरजू घटकांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे गरजू रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गोरगरीब कामगार, मजूर, …

Read More »

मँचेस्टर सिटीला नमवून चेल्सी ‘चॅम्पियन’; फुटबॉल लीग

पोर्तोे (पोर्तुगाल) ः वृत्तसंस्थाकाई होवित्झच्या एकमात्र गोलमुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीला 1-0ने हरवले आणि नऊ वर्षांत दुसर्‍यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात होवित्झने 42व्या मिनिटाला चेल्सीसाठी एकमेव विजयी गोल केला. मेसन माउंटच्या पासवर त्याने हा गोल केला. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीच्या संघाला सलग दुसर्‍या विजेतेपदाने हुलकावणी …

Read More »

पेणमधून एसटीच्या फेर्यांत वाढ

पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने रायगड एसटी प्रशासनाच्या वतीने एसटी फेर्‍यांमध्ये कपात करण्यात आली असून, थोड्या प्रमाणात पेण आगारातून पेण ते पनवेल, पेण ते अलिबाग अशी बससेवा सुरू होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने कोरोनाचे नियम पाळून पुन्हा एसटी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू …

Read More »

बोटी लागल्या किनार्याला

अलिबाग : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर आणण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 29) अलिबाग तालुक्यातील नवेदर नावगाव येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्‍यावर आणल्या. समुद्रात 1 जूनपूर्वी मासेमारीस …

Read More »

खालापूरच्या सुरक्षेसाठी आता ‘तिसरा डोळा’

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पूर्वी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी खबर्‍यांचे जाळे असायचे. आता बदलत्या काळाप्रमाणे सीसीटीव्ही तंत्रज्ञान पोलीस विभागाकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून, खालापूर येथे लोकसहभागातून सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी …

Read More »

वृक्ष लागवड मोहिमेवर कोरोनाचा परिणाम

रोपांच्या संख्येत घट; यंदाचा लक्ष्यांक घसरला अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 200 झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, मात्र यंदा कोरोनामुळे नवीन …

Read More »