Breaking News

Monthly Archives: May 2021

पेणमधील आदिवासी वाड्यांवर आरोग्य तपासणी

पेण : प्रतिनिधी येथील अंकुर ट्रस्ट आणि मैत्रेय राज फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती तसेच तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव आता आदिवासी वाड्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र ही महामारी व लसीकरणाबाबत  आदिवासींमध्ये अनेक गैरसमज आहेत. तो दूर करण्यासाठी अंकुर ट्रस्ट …

Read More »

खोपोलीतील ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण संथगतीने

आरपीआयचा आंदोलनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याच्या कामाचे  घोंगडं अनेक वर्षापासून भिजत पडलेले असतानाच  मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या काँक्रीटीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावरून जाताना वाहनचाकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी …

Read More »

मुरूडमधील नारळ उत्पादक, बागायतदार अडचणीत

रायगड जिल्ह्यातील भात पिकापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारीचे मोठे उत्पन्न घेतले जाते. मात्र कोरोना महामारी, लॉकडाऊन तसेच निसर्ग व तौत्के चक्रीवादळाच्या दणक्याने सुपारीसह नारळाची बहुतांशी झाडे जमिनदोस्त झाल्याने येथील नारळ उत्पादक बागायतदार व व्यापारी संकटात सापडले आहेत. मुरुड तालुक्यातील बागायती क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक हेक्टर बागायत क्षेत्रातील हजारो नारळाची झाडे चक्रीवादळात …

Read More »

निर्बंधांची धग

कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापार्‍यांचे अपरंपार नुकसान झाले होतेच. त्यातून कसेबसे सावरत असतानाच कोरोनाची दुसरी लाट अंगावर आली. याहून अधिक नुकसान सहन करणे व्यापार्‍यांना निश्चितच परवडण्याजोगे नाही. सोबतच खाजगी नोकरी करणार्‍या नागरिकांना देखील आपली मासिक मिळकत चालू ठेवणे अवघड होत जाणार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये जीव जगवण्याला प्राधान्य आहे असे आपले …

Read More »

सावधान! नाळ तुटत आहे

‘ज्ञानदाता’ समाजघटकातील प्रत्येकाला, आपल्या सोयीनुसार, आपल्या घरात, घराबाहेरील मोकळ्या जागेत, अगदी मोजक्या व इच्छुक नात्यातल्या, गोतातल्या, परिचयाच्या विद्यार्थ्यांसाठी, ‘सुरक्षित’असे ‘बिंदु शिक्षण’ देणे शक्य आहे. ते घेणार्‍यांनी आपली गरज ओळखून ‘देणेकर्‍यांना’ प्रतिसाद देणेही गरजेचे आहे. अशा अनेक बिंदूंनी सिंधुशिक्षणाची गरज अंशतः तरी भागू शकते. काय शिकवायचे हेही ठरवणे गरजेचे आहे. हे …

Read More »

कोरोना रुग्णांना जेवणाच्या डब्यांचे वाटप; रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने खोपोलीतील कोरोना बाधित रुग्णांना तसेच विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे. या ’अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक जेवणाचे डबे देण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख रोहित कुलकर्णी यांनी दिली.कोरोनामुळे अख्खे कुटुंब …

Read More »

जांभुळपाडा गावात पाणीटंचाई; पंप नादुरुस्त झाल्याने पाच दिवसांपासून पाणी नाही

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावात रविवार  (दि. 23) पासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी एका मोटारपंपाने ओढून जॅकवेलमध्ये आणले जाते आणि ते  जलकुंभामध्ये साठवून गावाला …

Read More »

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप सरसावला; रोहा, खांब, मेढा, धाटाव विभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह कोकणाला बसला. या वादळग्रस्तांना आता भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. मुबंई भाजप उपाध्यक्ष तथा सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी रोहा तालुक्यातील वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील …

Read More »

किल्ले सुधागडावरील पाणवठे झाले जिवंत; ‘बा रायगड परिवार‘तर्फे श्रमदान मोहीम फत्ते

पाली : प्रतिनिधी ऐतिहासिक महत्व असलेल्या सुधागड किल्ल्यावर येणार्‍या दुर्गप्रेमींची तहान भागावी, त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने बा रायगड परिवार या संस्थे तर्फे किल्ल्यावर नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ले सुधागडावरील पाणवठ्यातील गाळ व कचरा काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे गडावर जाणार्‍यांना मुबलक पाणी …

Read More »

कर्जतमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत खडाखडी; हुकूमशाही खपवून घेणार नाही -सुरेश लाड; प्रशासकीय भवन कामाचे दोन वेळा भूमीपूजन

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शासनाच्या निधींमधून होणारी विकासकामे पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर खपवून घेण्याचे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. यापुढे या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी गुरूवारी (दि. 27) शिवसेनेला दिला. कर्जतमध्ये प्रशासकीय भवन …

Read More »