Breaking News

Monthly Archives: August 2021

टोकियो पॅरालिम्पिक : भारताच्या सिंहराजला कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जमा झाली आहेत. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश …

Read More »

गव्हाणच्या उपसरपंचपदी विजय घरत बिनविरोध; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विजय घरत यांची सोमवारी (दि. 31) बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घरत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजप युतीचे विजय घरत यांची बिनविरोध निवड …

Read More »

हिंदूंच्या सणांमध्येच कोरोना पसरतो का?; मनसेचा सवाल; ठाण्यात दहीहंडीसाठी आंदोलन

ठाणे ः प्रतिनिधीकोरोना प्रादूर्भावामुळे दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे, पण मनसेने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी (दि. 30) भगवती मैदानावर आंदोलन केले. जुहूमधील ना. नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालते. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा …

Read More »

खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे

वाशिम ः प्रतिनिधी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वाशिममधील देगाव, शिरपूर व इतर अशा पाच शिक्षण संस्था आहेत. मागील वर्षी तेथून पाच कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. बालाजी …

Read More »

पालीमध्ये नाल्यात पडून दुचाकीस्वार जखमी

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली एसटी स्थानकाजवळील  स्लॅब फोडलेल्या नाल्यात पडून सोमवारी (दि. 30) एक दुचाकीस्वार जखमी झाला. अनेक महिन्यांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या या नाल्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाली एसटी स्थानकात तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने परिहन मंडळाच्या परवानगीने …

Read More »

‘कर्नाळा’च्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास किमान सहा महिने लागणार

पनवेल ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने नियमातील मर्यादा वाढवल्याने कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना डीआयसीजीसीच्या सुधारित नियमानुसार पाच लाखांपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार असल्याने सोमवारी (दि. 30) बँकेच्या मुख्य शाखेत त्याबाबत अर्ज करण्यासाठी ठेवीदार आणि खातेदारांची मोठी रांग लागली होती. या वेळी अनेक ठेवीदार माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी …

Read More »

शिघ्रे ग्रामपंचायत डम्पिंग ग्राऊंडच्या प्रतीक्षेत

घंटागाडी बंद असल्याने वेशीवर कचर्‍याचे साम्राज्य! मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीने घंटागाडी बंद केली असल्याने ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून गावाच्या वेशीवरील गटारात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. प्रशासनाने ग्रामपंचायतीला तातडीने डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.  पूर्वी शिघ्रे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात …

Read More »

आराम बस ट्रेलरला धडकली

एक्स्प्रेस वेवरील अपघातात अनेक प्रवासी जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 30) सकाळी  पुण्याकडून मुंबईकडे जाणारी प्रवाशी आराम बस पुढे जात असलेल्या ट्रेलरला मागून धडकली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात …

Read More »

नेरळमध्ये मेडिकल स्टोअरला आग

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली कर्जत : बातमीदार नेरळ बाजारपेठेतील माऊली मेडिकल स्टोअरला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील औषधांचा साठा व अन्य वस्तू मिळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नेरळ मुख्य बाजापेठेतील शिवरत्न …

Read More »

अलिबागेत भाजपचे शंखनाद आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना निर्बंधात राज्य सरकारने सुट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र मंदिरे अद्याप खुली झालेली नाहीत. राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपतर्फे सोमवारी (दि. 30) राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग येथेही श्री काशी विश्वेश्वर मंदिरासमोर घंटानाद व शंखनाद …

Read More »