Breaking News

Monthly Archives: August 2021

मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार!; पनवेलसह राज्यात शंखनाद आंदोलन; मंदिरे खुली करण्याची भाजपची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनाचे निमित्त करीत हिंदू धर्मातील सण-उत्सवांचे महत्त्व कमी करण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे मंदिरे खुली करण्यासाठी आणि झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी (दि. 30) भाजपच्या वतीने राज्यस्तरीय शंखनाद आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल ‘सुवर्ण’धमाका

टोकियो ः भारतीय नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय भारताच्या योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले. दोन वेळचा सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाने या वेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर मोहोर उमटवली, तर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या …

Read More »

माथेरानची हर्षा शिंदे ‘मिस हेरिटेज इंडिया’ची मानकरी

कर्जत : प्रतिनिधी भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंन्मेंटने पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात माथेरान येथील हर्षा विनोद शिंदे (सध्या रा. महाबळेश्वर) ही मिस हेरिटेज इंडिया किताबाची मानकरी ठरली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तसेच अभिनेत्री हेमांगी कवी यांनी हर्षा हिला मिस हेरिटेज इंडियाचा मुकुट चढवून कौतुक केले. या …

Read More »

तहसीलदार चप्पलवार यांची बीड खुर्दला भेट; ग्रामस्थांना सूचना

खोपोली : प्रतिनिधी हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीबाबत ऑरेंज इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खालापूरचे तहसीलदार चप्पलवार यांनी धोकादायक दरडप्रवण वाटणार्‍या बीड खुर्द आदिवासीवाडी आणि बौद्धवाडा या ठिकाणी रविवारी (दि. 29) भेट देत ग्रामस्थांना उपयुक्त सूचना केल्या. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज इशारा देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन …

Read More »

माणगाव एसटी बसस्थानकाची दैनावस्था

प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष माणगाव : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या माणगाव बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत चालक या स्थानकात बस घेऊन येतात, तसेच प्रवासीदेखील चिखलातून मार्ग काढीत बस स्थानक गाठतात, मात्र त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत …

Read More »

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचा 26 वर्षांचा प्रवास

किरण ठाकूर यांनी समविचारी, समर्पित आणि विकासाभिमुख सहकार्‍यांसमवेत 1995 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीची स्थापना केली. 31 ऑगस्ट 1995 रोजी एकाच शाखेपासून सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीचा गेल्या 26 वर्षांत विस्तार झपाट्याने वाढला आहे. आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे 213+ पेक्षा जास्त शाखा आहेत, ज्यात 5500 कोटीपेक्षा …

Read More »

गोविंदा रे… गोपाळा!

श्रावण महिना आला की गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडता सण-उत्सव म्हणजेच गोपाळकाला. गोपाळकाला हा श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. या दिवशी ठीकठिकाणी दहीहंडी टांगली जाते आणि बालगोपाळांची गोविंदा मंडळे त्या ठिकाणी जाऊन मनोरे लावून दहीहंडी फोडतात आणि …

Read More »

क्रिकेटपटू साक्षी लाडचा गावकीकडून सत्कार

कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात कर्जत तालुक्यातील दहिवली येथील साक्षी विलास लाड हिची निवड झाली आहे. साक्षीच्या रूपाने कर्जतमधील महिला क्रिकेटपटूची निवड होणे ही पहिलीच घटना आहे. याबद्दल तिचा दहिवली येथे गावकीकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, …

Read More »

राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये मानसी पवारला रौप्यपदक

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील मानसी युवराज पवार हिने गोवा राज्यात झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशभरातून 60 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. मानसी पवार ही 23 वर्षीय मुलगी ऐरोलीत राहते.पत्रकारिता व न्यू मीडिया पदवी प्राप्त मानसीला किक बॉक्सिंगची आवड आहे. म्हणून तिने मागील …

Read More »

अवनी लेखराने रचला इतिहास; पॅरालिम्पिक नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करीत आहेत. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी नेमबाजीत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. …

Read More »