Breaking News

Monthly Archives: August 2021

बहिर्यांसाठी शंखनाद

देवस्थाने लवकरात लवकर उघडावीत ही मागणी भारतीय जनता पक्षाने पहिल्यापासून सातत्याने लावून धरली आहे. तरीदेखील महाविकास आघाडीचे सरकार डोळे आणि कान मिटून स्वस्थ बसून आहे. सरकारच्या बहिर्‍या कानांवर देवस्थानांच्या मागण्या जरा मोठ्या आवाजात पडाव्यात या हेतूने भाजपतर्फे सोमवारी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या उत्स्फूर्त आक्रोशाचा सूर कानावर पडल्यानंतर तरी सरकारचे …

Read More »

नगरसेवक नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोरोना लसीकरण शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांचा वाढदिवस रविवारी (दि. 29) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरातील गोखले सभागृहात मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट …

Read More »

क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल

 मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा विश्वास नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासबका साथ, सबका विकास यासोबतच सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत …

Read More »

पनवेलच्या पाडा मोहल्ल्यात साफसफाई

नगसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील पाडा मोहल्ल्यात बरेच दिवस झाले साफसफाई व्यवस्थित होत नव्हती. त्याबद्दल तेथील नागरिकांनी ही समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी त्वरित महानगरपालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून पाडा मोहल्यात सफाई करून घेण्यास सांगितले. महानगरपालिका सफाई विभागाने तक्रारीची दखल घेत पाडा मोहल्यात साफसफाई …

Read More »

भारताच्या भाविनाची ऐतिहासिक कामगिरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्थाभारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण देशाला ही भेट दिली आहे.टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अंतिम फेरीत 34 वर्षीय भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या …

Read More »

मन की बातचे कार्यक्रमाचे पनवेलमध्ये थेट प्रक्षेपण

पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ, सबका विकास यासोबत सबका प्रयास या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे देशवासीयांशी संवाद साधता वेळी केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे देशवसीयांशी संवाद साधतात. …

Read More »

मंत्री, शिवसेना नेते अनिल परब यांना ‘ईडी’ची नोटीस

मुंबई : ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करीत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा …

Read More »

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 45,083 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 35,480 जण कोरोनातून बरेही झाले आहेत. देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची …

Read More »

एसटी कर्मचार्यांची दुर्दशा

महाडममध्ये ना पगार, ना मदत; ठाकरे सरकारवर कामगार नाराज महाड : प्रतिनिधी महाडमध्ये पूर आला आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले. घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, मात्र पूरग्रस्त एसटी कामगारांना गेली दोन महिने पगार, पूरग्रस्त म्हणून मदत मिळालेली नाही. महामंडळाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण कोकणात …

Read More »

ममदापूरच्या नागरी भागात भर पावसाळ्यात पाणीटंचाई; नागरिकांना प्यावे लागतेय बोअरवेलचे पाणी

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वेस्थानकातून जेमतेम 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने ममदापूरच्या नागरीकरण होत असलेल्या भागात मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांनी घरे घेतली, मात्र त्या नागरी वस्तीतील लोकांना ममदापूर ग्रामपंचायत नळाचे पाणी पोहचवू शकली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना तेथे खोदलेल्या बोअरवेलचे पाणी सध्या प्यावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रासलेल्या ममदापूर नागरी …

Read More »