कोपनहेगन ः वृत्तसंस्था भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवत डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत सिंधूने 67 मिनिटांच्या झुंजीनंतर बुसाननवर 21-16, 12-21, 21-15 असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या सिंधूची विश्रांतीनंतरची ही पहिलीच …
Read More »Monthly Archives: October 2021
एका षटकामध्ये तब्बल 50 धावा; ऑस्ट्रेलियातील क्लब सामन्यात कारनामा
मेलबर्न ः वृत्तसंस्था एक फलंदाज एका षटकामध्ये किती धावा करु शकतो? जर फलंदाजाने सर्वच्या सर्व सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले तर जास्तीत जास्त 36 धावा त्याला करता येतील, मात्र ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू सॅम हॅरिसनने तब्बल आठ षटकार लगावले. क्लब सामन्यात नॅथन बेनेट या गोलंदाजाच्या सॅमने हा कारनामा केला. सोरेंटो डनक्रेगच्या सीनियर …
Read More »स्कॉटलंडचा ओमानवर विजय; सुपर 12 फेरीत प्रवेश
अल अमिरात ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडने ओमानवर आठ गडी राखून विजय मिळवला आहे. ओमान संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 122 धावा करू शकला. हे आव्हान स्कॉटलंडने 17 षटकांत दोन गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह स्कॉटलंडने सुपर 12 फेरीत प्रवेश केला आहे. …
Read More »बांगलादेश ‘सुपर 12’मध्ये
अल अमिरात ः वृत्तसंस्था स्कॉटलंडकडून सलामीच्या लढतीत पत्करलेल्या बांगलादेशने गुरुवारी पापुआ न्यू गिनी संघावर 84 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुपर 12 फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 7 बाद 181 धावांचे आव्हान उभे …
Read More »प्रगतीचा महामंत्र
विकासाची ओढ असलेला मनुष्य संकटात देखील संधी शोधतो. इतकेच नव्हे तर त्या संधीचे सोने करतो. इच्छाशक्ती मात्र दांडगी हवी. भारताच्या सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अशी दांडगी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वेळामध्ये लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणार्या भारताचे आता जगभरात कौतुक होत आहे. नेतृत्वाच्या …
Read More »विवेक पाटलांचा जेलमधील मुक्काम सहा दिवसांनी वाढला
पनवेल : कर्नाळा बँकेचे चेअरमन, शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सहा दिवसांनी वाढलाय. न्यायालयाने विवेक पाटलांच्या कोठडीत 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ केलीये. कर्नाळा बँक घोटाळ्याची सुनावणी गुरुवारी (दि. 21) होती. या वेळी विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. विशेष सरकारी वकील वेणेगावकर यांनी ‘ईडी’ची …
Read More »पनवेलमध्ये आज मनोरंजन अनलॉक; भाजप सांस्कृतिक सेलतर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य कर्मचार्यांचे अभिनंदन
खारघर : रामप्रहर वृत्त भारताने गुरुवारी (ता. 21) 100 कोटी लसीकरणाचा विक्रमी आकडा पार करून जागतिक स्तरावर अव्वल ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या ऐतिहासिक क्षणी सर्व आरोग्यदूतांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. या वेळी खारघर-तळोजे मंडल उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी खारघरमधील सर्व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांना भेट देऊन …
Read More »भास्कर जाधव म्हणजे शेतातील बुजगावणे : प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कुठलीही घटना घडली, तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टुडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखे वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादे बुजगावणे असावे असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते …
Read More »संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर अविश्वास : किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना काल एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये संजय …
Read More »