Breaking News

Monthly Archives: October 2021

अलिबाग-मुरूड रस्त्याचे काम का रखडले याचा आधी शोध घ्या!; शिवसेनेचा शेकापवर पलटवार

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आंदोलन करणार्‍या शेकापने अलिबाग-मुरूड रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करावे. या कामाचा ठेकेदार कोण आहे? ते काम का रखडले? याचाही शोध घ्यावा, असे म्हणत शिवसेना जि. प. सदस्य मानसी दळवी यांनी शेकाप नेत्यांवर निशाणा साधला आहे. विकासकामे अडविण्याचे काम आम्ही करीत नाही. उलट शेकाप नेत्याच्या कंपनीमुळेच या …

Read More »

सणासुदीत मेड इन इंडिया वस्तू खरेदी करा -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी सणांमध्ये मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एकेकाळी परदेशी वस्तूंची खूप क्रेझ होती, पण आज मेड इन इंडियाची शक्ती खूप वाढली आहे. आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी मेड …

Read More »

रायगडात मराठा क्रांती मोर्चाची जनसंवाद यात्रा

कर्जतमध्ये नियोजन बैठक संपन्न कडाव : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाची जनसंवाद यात्रा रायगड जिल्ह्यात येणार असून, यात्रेच्या तयारी संदर्भात गुरूवारी (दि. 21) संध्याकाळी कर्जतमधील रॉयल गार्डन सभागृहात संबंधीतांची बैठक झाली. या बैठकीत जनसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील रायगड जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेची सुरुवात …

Read More »

माथेरानची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल

कर्जत : बातमीदार कोविड हद्दपार करण्यासाठी माथेरान नगर परिषदेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत पहिली मात्रा 99 टक्के पूर्ण झाली असून दुसरी मात्राही 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. पर्यटनस्थळ असल्यामुळे माथेरानला लाखो पर्यटक भेट देत असतात. इथे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून माथेरान नगर परिषदेने कंबर कसली असून वेगवेगळ्या …

Read More »

वेतन फरकाची रक्कम द्या

जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे वेतन अधीक्षकांना साकडे मुरूड : प्रतिनिधी माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात दिली जाणारा आहे, त्यापैकी पहिला  हप्ता हा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघातर्फे वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांच्याकडे गुरुवारी …

Read More »

नेरळ बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

कर्जत : बातमीदार नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर केलेली अतिक्रमणे आतापर्यंत दोनवेळा जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणे करणार्‍यांना कोणतेही भय राहिले नाही. त्यामुळे आता या बाजारपेठेला पुन्हा एकदा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या रस्त्याची मालकी असलेली रायगड जिल्हा परिषद आणि ताबा असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे त्यावर कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. नेरळ …

Read More »

चौकमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीचा उपक्रम चौक : रामप्रहर वृत्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील बिर्ला कार्बन कंपनीने माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत गुरुवारी (दि. 21) चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू …

Read More »

पोलीस हुतात्म्यांना अलिबागमध्ये मानवंदना

अलिबाग : प्रतिनिधी पोलीस हुतात्मा दिनानिमित्त अलिबागमधील रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे गुरुवारी (दि. 21) आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात  रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहीद स्मारकास जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या  उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. यावेळी …

Read More »

लुटूया निसर्गाचे वाण

देतोय भरभरून वैभव निसर्ग हा सहस्त्रकराने नकोच सृष्टीचा विद्ध्वंस गाऊ सारे प्रेमाचे तराणे आदिमानवापासून उत्क्रांत झालेला आजचा हा मानव आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण झाला आहे. जगभरात आधुनिकीकरणाचे वारे वाहत आहेत. घरबसल्या सर्व काही मिळण्याची उपलब्धता झाल्याने निसर्गाचा मात्र र्‍हास होत आहे. कारण विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी मानवाने निसर्गावरच कुर्‍हाड चालवली आहे. वने, …

Read More »

पनवेल ः भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 100 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला. याबद्दल भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल आणि सुषमा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून डोसचा ऐतिहासिक टप्पा अधोरेखित करण्यात आला. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, भाजप …

Read More »