खालापूर : प्रतिनिधी विद्युत पुरवठ्यामध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण उपअभियंत्यांना निवेदन दिले. परिसरातील विविध समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशन मोहपाडा यांच्या शिष्टमंडळाने एमएसईबी कार्यालय उपअभियंता किशोर पाटील यांना शनिवारी (दि. 9) परिसरातील विविध समस्या सांगितल्या. विद्युत पुरवठा …
Read More »Monthly Archives: October 2021
टी-20 वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल!; आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम जाहीर
दुबई : वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपला 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाली किती रुपयांचे बक्षीस मिळणार याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स (12.2 कोटी), तर उपविजेत्या संघाला आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6.1 कोटी रुपये मिळतील. याचबरोबर …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौर्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेला झटका; कुडाळमधील तीन पं. स. सदस्य भाजपमध्ये
कुडाळ ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी चिपी विमानतळ उद्घाटन समारंभासाठी सिंधुदुर्गात आले. त्यानंतर रविवारी (दि. 10) भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती …
Read More »पंतप्रधान मोदी लोकशाही मानणारे नेते; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उलगडला जीवनप्रवास
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरंकुश किंवा हुकूमशाही वृत्तीचे असल्याचे होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. पंतप्रधान मोदींशी आपला अनेक दशकांपासूनचा संपर्क आहे. तेे लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांच्यासारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. पंतप्रधान मोदी छोट्यातील छोट्या व्यक्तीचेही धीराने ऐकतात, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »‘सुदर्शन केमिकल्स’ सलग दुसर्यांदा इंडिया महात्मा अवॉर्डने सन्मानित
धाटाव : प्रतिनिधी सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सलग दुसर्यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स 2021’ने सन्मानित करण्यात आले. पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी लिफ्टची उभारणी
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जतकडील नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उद्वाहन बसवले जाणार आहे. या उद्वाहनाचे फ्लॅट 2 वरील काम 80 टक्के पूर्ण झाले असून फ्लॅट एकवरील उद्वाहनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नेरळ या जंक्शन रेल्वेस्थानकातून माथेरानकरिता मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान-नेरळ असा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची मोठी गर्दी …
Read More »माणगावमध्ये यंदा भातपीक उत्तम; कापणीची लगबग
शेतकर्यांना भरघोस उत्पन्नाची आशा माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात यंदाच्या वर्षी भात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असले, तरी यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत भातपिकाला पोषक पाऊस, हवामान व वातावरण मिळाल्यामुळे माणगाव तालुक्यात भातपीक उत्तम आले आहे. शेतकर्यांची मेहनत आणि निसर्गाने दिलेली साथ यामुळे शिवारातील शेती चांगलीच फुलली आहे. अनेक ठिकाणी खडकाळ, …
Read More »टी-20 वर्ल्डमध्ये होणार डीआरएस वापर
दुबई ः वृत्तसंस्था 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. टी- 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागचा वर्ल्डकप 2016मध्ये झाला होता तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती, पण …
Read More »भारताच्या शिखा पांडेचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’
सिडनी ः वृत्तसंस्था महिला टी-20 मालिकेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा चार गडी राखून पराभव झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0ने आघाडी घेतली आहे. असे असले तरी भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार …
Read More »कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा; सर्वाधिक पदकांसह भारताचे वर्चस्व
लिमा ः वृत्तसंस्था कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त केले. अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताने अव्वलस्थान पटकाविले. महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले. मानवी सोनीने (105) सुवर्ण, …
Read More »