अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे सरकारने निर्बंध हळूहळू सैल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता रायगडच्या किनार्यांकडे वळू लागली आहेत. रायगडमधील अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, मुरूड इथल्या समुद्र किना़र्यांवर पर्यटक दिसू लागले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने रायगडमध्ये …
Read More »Yearly Archives: 2021
चौकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई अविनाश देशमुख यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्रभाई शहा, सेक्रेटरी योगेंद्रभाई …
Read More »मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद
कर्जत : प्रतिनिधी तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतमधील नागरिकांनी कोरोना संकटाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष …
Read More »विजयी विश्व तिरंगा प्यारा
नेरळमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण कर्जत : बातमीदार हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळमधील हुतात्मा चौकात मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी शूरवीर मयूर शेळके यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावावे, असे आवाहन मयूर शेळके यांनी या वेळी केले. त्याआधी सरपंच उषा पारधी आणि मयूर शेळके यांच्या हस्ते मशाल …
Read More »ई-पीक अॅपचे शेतकर्यांना प्रशिक्षण
उरण : वार्ताहर उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच ई-पीक पाहणी अॅपचे प्रशिक्षण तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकर्यांसाठी स्वतःच्या शेतातील पीक पेरा भरण्याच्या कामासाठी त्यांना ई-पिक पाहणी डेमो अॅपचे प्रशिक्षण शिबिर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उरणमध्येही शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यातील मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात ग्रंथपाल दिन
उरण : वार्ताहर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या फूंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांच्या हस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी …
Read More »भाजयुमोतर्फे 75 किमी सायकल रॅली
पनवेल : वार्ताहर भारताच्या 75व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) संपूर्ण देशभरात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरामध्ये 75 किलोमीटर मॅरेथॉन किंवा सायकल रॅली अशा युवा संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल …
Read More »पनवेल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात
भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी होऊ न देण्यासाठी …
Read More »पोलादपुरात वाकण हद्दीतील घरे, शेतजमिनींना तडे
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील धामणेचीवाडी आणि सानेवाडी येथील जमिनीला आणि घरांना भेगा पडल्या असून, तेथील ग्रामस्थांना कापडे येथील तात्याबा साने यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक म्हशी, गाय, बैल, वासरू या पशुधनासाठी मोकळ्या जमिनीवर कोंडवाडा बांधण्यात आला असून, तेथे त्यांना ठेवण्यात आले आहे. …
Read More »…अन्यथा महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे थांबवावी लागतील -नितीन गडकरी
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper