Breaking News

Yearly Archives: 2021

महाडमधील शेतकरी, व्यापार्‍यांना विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने द्यावी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी रायगड तसेच महाड जिल्ह्यामधील जलप्रलयामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत येथील शेती आणि व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. महाड शहर आणि तालुक्यांमध्ये ही आपत्ती फार मोठ्या प्रमाणावर भेडसावली. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापर्‍यांना दिलासा देण्यासाठी विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी. तसेच व्यापारी व शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ‘मविआ’ची टाळाटाळ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात, अशोक चव्हाणांना दिले आव्हान

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्री अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आरक्षणाविषयी राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याऐवजी सतत केंद्रावर आरोप करता. राज्य सरकार नेहमी काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळेच तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे …

Read More »

भाजप कार्यकर्ते अविनाश म्हात्रे यांचे निधन

नावडे परिसरात हळहळ व्यक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणशेठ म्हात्रे (नावडे, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ यांचे 5 ऑगस्ट रोजी, तर आईचे 18 जुलै रोजी निधन झाले होते. या आघातामुळे त्यांच्या कुटुंबावर …

Read More »

रवी शास्त्रींसह अन्य प्रशिक्षक सोडणार पद?

भारतीय संघात होणार मोठे बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघामध्ये टी-20 वर्ल्डकपनंतर मोठे बदल केले जाणार असून रवी शास्त्री प्रशिक्षकपदापासून दूर होणार असल्याची शक्यता आहे.एका वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणार्‍या टी …

Read More »

रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल

असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद कदम अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडीसाठी कार्यकारिणीची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये अध्यक्षपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय डायरेक्ट प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष बिपिनकुमार चहल, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी. बी. साळुंके, अखिल भारतीय असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव …

Read More »

पॅरिसमधील क्लबशी मेस्सी करारबद्ध

पॅरिस ः वृत्तसंस्थाबार्सिलोना क्लबला अलविदा केल्यानंतर विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या लिओनेल मेस्सीने आता पॅरिस सेंट-जर्मेन क्लबशी करारबद्ध झाला आहे. पुढील दोन वर्षांसाठी तो फ्रान्समधील या संघाकडून खेळताना दिसणार आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणार्‍या मेस्सीने काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला. तब्बल 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेस्सी आता चार …

Read More »

भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने

गुरुवारपासून दुसरी कसोटी लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंड दौर्‍यावर गेलेला भारतीय संघ यजमानांसोबत गुरुवार (दि. 12)पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत पुन्हा एकदा भिडेल. याआधी झालेल्या पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताला विजयाने हुलकावणी दिली होती. आता दोन्ही संघांची नजर दुसर्‍या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा असेल.दरम्यान, दुसर्‍या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा …

Read More »

कोशिश फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला होता. या अभियानांतर्गत …

Read More »

मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?

भाजपची राज्य सरकारवर घणाघाती टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. यावरून, मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करीत भाजपने ठाकरे …

Read More »

रायगडातील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.  अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात दरडी कोसळल्या. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक घर कासळली. पूरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. लायन्स क्लब ऑफ …

Read More »