Breaking News

Monthly Archives: January 2022

कोरोना, ओमायक्रॉनविषयी मुरूड नगर परिषद सतर्क

शहरात जनजागृती, विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा इशारा मुरूड : प्रतिनिधी कोरोना, ओमायक्रॉनला प्रतिबंध व्हावा, या हेतूने मुरूड नगर परिषदेतर्फे मंगळवारी (दि. 4) शहरात जनजागृती करण्यात आली. नगर परिषद कर्मचार्‍यांनी या वेळी शहातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी पंकज भुसे, कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, करनिरीक्षक …

Read More »

बाळशास्त्री जांभेकर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

इंग्रज राजवटीत मराठी वर्तमानपत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान दर्पणकारांना जातो. चिपळूणकर, टिळक, आगरकर, न्या. रानडे यांचे कर्तृत्वपर्व सुरू होण्याआधी ज्या लोकोत्तर महापुरुषांनी महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक जीवनाची पायाभरणी केली, त्यांच्यात कै. बाळशास्त्री जांभेकरांचे नाव सर्वोच्च …

Read More »

15 ते 18 वयोगटाचे कोरोना लसीकरण; उरणमध्ये दोन दिवसांत 1250 विद्यार्थी लसवंत

उरण : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवार (दि. 3)पासून सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांत उरणधील आठ विद्यालयामधील जवळ जवळ 1250 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती उरण आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. कोरोनाने दोन वर्षे हाहाकार माजला आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय …

Read More »

स्वच्छतादूतांना मोफत धनुर्वात इंजेक्शन सुविधा; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार खारघर प्रभाग 4 मध्ये स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छतादूतांना डॉ. रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व अ‍ॅडल्ट क्लिनिक यांच्या वतीने मोफत धनुर्वात (टीटी) इंजेक्शन देण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका नेत्रा पाटील यांनी हा उपक्रम राबवला. या वेळी जवळपास 80 स्वच्छतादूतांना ही लस …

Read More »

रसायनीत रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मोहोपाडा : प्रतिनिधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस ‘रेझिंग डे’म्हणून साजरा केला जातो. या रेझिंग डे दिवसांत विविध उपक्रम पोलीस ठाण्यामार्फत होतात. रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयात बुधवारी (दि. 5) रेझिंग डे …

Read More »

रेशन कार्डधारकांसाठी मेरा रेशन मोबाइल अ‍ॅप

खारघर : प्रतिनिधी मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबातील लोकांना फेअर प्राईज शॉप सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणार्‍या सुविधांबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. मेरा रेशन अ‍ॅप हे अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाँच …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि. 4) करण्यात आली. दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना काळातही पांडुरंग आमले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना त्यांनी याहीपुढे जावून आपल्या …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतही 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या मालमत्तांना कर माफ करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 500 स्क्वेअर फूटपर्यंतच्या मालमत्तांना कर माफ करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले आहे. पनवेल महापालिका 2016मध्ये स्थापन होऊन आता पनवेल महापालिकेस पाच वर्षे …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला; एकाच दिवसात आढळले 1072 रुग्ण, कोविड सेंटर्स पुन्हा सुरू

नवी मुंबई : बातमीदार मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून 26 डिसेंबरपासून रुग्णवाढीस सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 4) 1072 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आशा परिस्थितीत आयुक्त बांगर यांनी शहरातील सर्व कोविड सेंटर्स पुन्हा सुरू केले आहेत. कोविड सेंटर्स सुरू करताना त्यासाठी …

Read More »

अनाथांची माय हरपली… सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद

पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयवि काराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, …

Read More »