Breaking News

Monthly Archives: March 2022

शेकापचे गजानन पाटील व सहकारी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांचे शेकडो सहकारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशातून शेकापला मोठा झटका बसणार आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात येत्या रविवारी (दि. 13) …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क, नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबत तारांकित प्रश्न

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकारण्यात येणार्‍या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत आकारण्यात येणारा एक टक्के …

Read More »

महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी सज्ज व्हा!; देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई ः प्रतिनिधी उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) …

Read More »

पनवेलमध्ये राष्ट्रीय कीर्तनसप्ताहाची सांगता

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कै. मुग्धा लोंढे यांचे स्मरणार्थ आणि महिला दिनाचे औचित्य साधत नगरसेविका रुचिता लोंढे आणि परिवाराच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात हा सप्ताह संपन्न झाला. याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. या सप्ताहात रायगड कीर्तन …

Read More »

खारघरमध्ये महिलांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाच औचित्य साधून महानगरपालिका प्रभाग 3 येथे भाजप युवा मोर्चाध्यक्ष विनोद घरत यांनी प्रभागातील गुणवंत अशा 15 महिलांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी आपले विचार मांडताना त्यांनी, जबाबदारीने संसार चालविणार्‍या महिलांच्या कामाचे कौतुक केले. या वेळी सारिका जाधव, प्रीती दिघे, नूतन डांगळे, जयश्री सूर्यवंशी, सरोजनी …

Read More »

रायगडात मास्क कारवाई न करण्याचा आदेश मागे

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मास्क न लावणार्‍यावर कायदेशीर कारवाई केसेस बंद करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे मास्क न लावता फिरल्यास आता पुन्हा नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा सुरक्षा विभागाने काढलेल्या पत्रामुळे जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे काढलेले पत्र मागे घेत असल्याचे जिल्हा …

Read More »

महाराष्ट्र भवन तातडीने उभारावे -आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई ः प्रतिनिधी वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. त्यात सिडकोकडून भवनाची जागा बदलण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडत 21 वर्ष रखडलेल्या या भवनाची जागा बदलण्यात येणार असल्याचे सांगत जागा न बदलता आहे तिथेच भवन उभारावे, अशी मागणी आ. मंदा …

Read More »

आदिवासींच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील विधानसभेत घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबत राज्य सरकारकडे माहिती देण्याची मागणी केली. या लक्षवेधीला उत्तर न दिल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारविरोधात …

Read More »

गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या त्रिकुटाला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कर्जत येथे कारवाई अलिबाग, नेरळ : प्रतिनिधी, बातमीदार गावठी कट्टा विक्रीस घेऊन जाणार्‍या कर्जतमधील तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. रवींद्र आनंद वैद्य (वय 35), सौरभ सुनील नवले (वय 26), सुनील त्र्यंबक वाठोरे (वय 36, सर्व रा. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची …

Read More »

विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणार्‍या एलएईएस शाळेची मान्यता रद्द करावी

सम्यक विद्यार्थी परिषदेची मागणी कर्जत : बातमीदार शाळेची फी न भरल्यामुळे एलएइएस शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणार्‍या नेरळ येथील एलएइएस शाळेवर कारवाई करावी आणि त्यांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. कोविड …

Read More »