पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींचे आरोग्य समुपदेशन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचा महत्त्वाकांक्षी अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. विविध विषयांवर बाह्य तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. त्यातील …
Read More »Monthly Archives: October 2022
पनवेल मनपा कंत्राटी कामगारांना एक महिन्यांचा पगार दिवाळी बोनस
पनवेल : वार्ताहर मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पनवेल महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन दिल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. पनवेल महापालिका प्रशासनात मनपा स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या बरोबरच कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुजी कंत्राटंदार यांच्या कडे …
Read More »नागरी सेवेच्या भूखंड उपलब्धतेसाठी आमदार मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा
सिडको प्रशासनासोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळणे संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांसह बैठक झाली. या वेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, सीबीडी येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, …
Read More »नवी मुंबईतही डोळ्यांची साथ
वाशी महापालिका रुग्णालयात दररोज 25 रुग्णांवर उपचार नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातही डोळे येण्याची साथ आली असून गेल्या आठवड्याभरापासून डोळ्याची साथ वेगाने वाढत आहे. नवी मुंबई महापालिका नागरी आरोग्य केंद्र,महापालिका व खासगी रुग्णालयात नेत्रसंसर्गबाधित रुग्ण वाढल्याच्या माहिती समोर येत आहे. अशी लक्षणे दिसताच योग्य ती काळजी घ्यावी, …
Read More »बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी
आशिष शेलार खजिनदार मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे असणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी (दि. 18) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 1983च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर …
Read More »राज्य शासकीय कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी मिळणार वेतन
मुंबई : प्रतिनिधी येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते, परंतु दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर …
Read More »महाडच्या खरवलीत मिरवणूक अंगलट
नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा …
Read More »मोदी सरकारची शेतकर्यांना दिवाळी भेट!
रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी …
Read More »पेण तालुक्यात 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना मिळणार दिवाळी शिधाचा लाभ
पेण : प्रतिनिधी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांत रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील सुमारे 41 हजार 500 रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर …
Read More »कर्जत : पोटल, पाली ग्रामपंचायतीत आघाडीची सत्ता; एका जागेवर ‘कमळ’ उमलले
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल आणि पाली खलाटी या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 17) झालेल्या मतमोजणीत पाली खलाटीमध्ये ग्रामविकास आघाडी, तर पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट विजयी झाला. पोटलमध्ये वर्षा मिनेश मसणे या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य निवडून आल्या आहेत. विजयानंतर कार्यकर्त्यांनी …
Read More »