पनवेल तहसीलदाराकडून 10 सक्शन पंप व एक बोट नष्ट पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत 10 सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली. या कारवाई दरम्यान स्वतः तहसीलदार विजय …
Read More »Yearly Archives: 2022
मालमत्ता कर भरणार्यांसाठी पनवेल पालिकेची प्रोत्साहनपर योजना
सहा लाखांच्या अपघात विमा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडणार पनवेल ः रामप्रहर वृत्त महापालिका प्रशासन मालमत्ता कर भरणार्यांना सहा लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. तसा ठराव केला असून मंगळवारी (दि. 21) होणार्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ही अपघात …
Read More »उसर्ली खुर्दचे माजी सरपंच विश्वास भगत, प्रमिला भगत यांच्यावर गुन्हा दाखल करा
राजिप सीईओंच्या आदेशान्वये बीडीओंची पनवेल पोलिसांत तक्रार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इमारत बांधकामांना बोगस परवाना देऊन नागरिकांची फसवणूक आणि शासनाचा महसूल बुडविप्रकरणी माजी सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »रोडपाली जंक्शनवर वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे, मात्र रोडपाली जंक्शनवर आता वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. सध्या रोडपाली जंक्शन येथे फूडलँड कंपनीसमोर …
Read More »महिनाभरात दिव्यांगांना मिळणार स्टॉल
गतीमान कार्यवाहीचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई ः बातमीदार दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून 14 भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झालेली आहे. या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा आणखी एक विजय; सर्वेक्षणाला स्थगिती; २४ जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याच्या नोटिसा पारगाव, कुंडेवहाळ आणि ओवळे या गावांना सिडकोकडून देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज पारगाव येथे सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव समितीने प्रखर विरोध केल्याने सिडको …
Read More »चेतन घरत यांना कारणे दाखवा नोटीस
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन रामचंद्र घरत यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 17) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पनवेल तालुक्यातील वळाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावावर …
Read More »संकष्ट चतुर्थीनिमित्त पाली व महडमध्ये गर्दी
मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप; चोख बंदोबस्त रायगड ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी रायगड जिल्ह्यात असणार्या पाली व महड येथे गुरुवारी (दि. 19) संकष्ट चतुर्थीनिमित्त महड येथे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. पाली येथील श्री बल्लाळेश्वर व महड येथील श्री वरदविनायक ही दोन गणतीची स्थळे अष्टविनायकांपैकी महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने …
Read More »वेळकाढू कारस्थान
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे केवळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भिजत पडले होते असे मानले जाते. वास्तविक या निवडणुका लागलीच जाहीर झाल्या तर आपली धुळदाण उडेल याची खात्रीच असल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये रस नव्हता. अजुनही सत्तेत असलेले तिन्ही पक्ष निवडणुकांसाठी तयार आहेत …
Read More »मोरा जेट्टीच्या शौचालयाची दुरवस्था
प्रवाशांची गैरसोय; लक्ष देण्याची मेरी टाईम बोर्डाकडे मागणी उरण : प्रतिनिधी उरण येथील मोरा जेट्टीच्या शौचालयाची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, मात्र त्याकडे मेरी टाईम बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशामध्ये वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. मेरीटाइम बोर्डने या समस्यानकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी विशेष करून महिला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper