Breaking News

Yearly Archives: 2022

पालीत नालेसफाईला मुहूर्त मिळेना

पावसाळ्यापूर्व कामे खोळंबली; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाली : प्रतिनिधी नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या पाली (ता. सुधागड) नगरपंचायत हद्दीतील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते, मात्र अजूनही येथील नालेसफाईच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे पालीकर जनतेतून नाराजीचा सूर आहे. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली शहर समस्यांमुक्त व सोईसुविधांनी परिपूर्ण असावे …

Read More »

ट्रेन्ड इज फ्रेंन्ड

बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणे आणि हे काहीशा सोप्या अभ्यासाने साध्य होऊ शकते. मागील दोन महिन्यात बाजाराने चांगलाच रंग दाखवला आहे आणि हा रंग ओळखण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक सर्व अगदी जिवाचे रान करताना आढळतात. परंतु अगदी नगण्य लोकांनाच यात यश मिळताना दिसते आणि बहुधा …

Read More »

कश्यप, कहार, निषाद, भोई आणि कोळी समाजाच्या समस्या सोडविणार

केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे आश्वासन नवी मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय कश्यप, कहार, निषाद, भोई व कोळी समाजाच्या अडचणी व समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यात येईल, तसेच त्या समस्या सुटण्यासाठी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर समस्या मांडल्या जातील, असे …

Read More »

नवी मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करा -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले. नवी मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकार्‍यांनी गेली दोन वर्षे धुमाकूळ घातला असून सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. केवळ आर्थिक फायदा असणार्‍या प्रकरणात लक्ष घातले जात असल्याचा आरोप करीत उच्च अधिकार्‍यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून …

Read More »

नवी मुंबईत 514 धोकादायक इमारती

पालिकेने केलेल्या विभागवार सर्वेक्षणातून माहिती नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ …

Read More »

दौर्याचे राजकारण

महाराष्ट्रातील सगळ्या समस्या संपुष्टात आल्या असून सर्वत्र आलबेल आहे आणि अयोध्येला कोण जाणार आणि कोण जाणार नाही, एवढाच एकमेव प्रश्न उरला असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असला तरी लवकरच तो व्यवस्थितपणे पार पडेल यात शंका नाही. देवाचे दर्शन …

Read More »

पनवेल परिसरातील नागरिकांना मिळणार विविध सोयीसुविधा

स्थायी समितीच्या सभेत 32 विषयांना मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या सभेत एकूण 34पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभेत एक विषय नामंजूर करण्यात आला, तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी …

Read More »

बिरवाडी ग्रामपंचायतीविरोधात दिव्यांगांचा एल्गार

महाड पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि. 20) महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त …

Read More »

खालापूरात काही शिवभोजन केंद्र नामधारी

तपासणीची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी गरीब व कष्टकर्‍यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी, मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असूनही, केंद्र चालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य …

Read More »

रोहेकर लोकलच्या प्रतीक्षेत

जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय रोहे : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील रोहे हे महत्त्वाचे व तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पुर्ण भार …

Read More »