एक कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप अकोला : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. …
Read More »Yearly Archives: 2022
कर्जतमध्ये दोन दिवस भीम महोत्सव
कर्जत : बातमीदार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील बहुजन बांधव यांच्या माध्यमातून 29, 30 एप्रिल रोजी कर्जतच्या पोलीस परेड मैदानावर भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात दोन वर्षे भीम महोत्सव आयोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे या वर्षी बहुजन समाजात भीम महोत्सवाबाबत उत्सुकता आहे. कर्जत तालुका …
Read More »नेरळसाठी 28.64 कोटींची नळपाणी योजना मंजूर
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजना जुनी झाली होती. यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. दरम्यान, शासनाने नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी 28 कोटी 64 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायतीची नळपाणी योजना 1998मध्ये …
Read More »अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली लूट थांबवा
अन्यथा भाजप मोठे आंदोलन करणार; युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा इशारा धाटाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून मार्च महिन्यात ग्राहकांना दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत. त्यातील एक बिल हे अतिरिक्त अनामत सुरक्षा ठेव रक्कम असल्याबाबत दिले गेले आहेत. त्यामुळे सर्वच ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेला आहे. आधीच …
Read More »कर्जत गारपोली येथे सिलिंडरचा स्फोट; दुकानाचे मोठे नुकसान
कर्जत : बातमीदार तालुक्यातील गारपोली येथे मंगळवारी (दि. 26) रात्री दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण दुका जळून खाक झाले आहे. कल्याण -कर्जत राज्यमार्गावर गारपोली गावाशेजारी जीवन शिंदे यांचे अल्पोपहार आणि चहाचे दुकान आहे. या दुकानात नाश्ता तयार करण्यासाठी असलेली शेगडी व सिलिंडरसह तेल असे ज्वलनशील साहित्य होते. मंगळवारी रात्री दुकान …
Read More »पडसरे पूल मोजतोय अखेरची घटका
ग्रामस्थांसह शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पडसरे गावाजवळील पुलाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. पडसरे गावासह, लोळगेवाडी, एकलघर व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला जोडणारा हा एकमेव पूल आहे. पुलावरून ग्रामस्थांसह आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी येथून ये -जा करतात. पावसाळ्यात पूल अचानक ढासळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पुलाची दुरूस्ती …
Read More »संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 17 प्रकरणे मंजूर
उरण ः वार्ताहर तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात शुक्रवार (दि. 22) बैठक पार पडली. या वेळी नवनियुक्त समितीचे अध्यक्ष मनोज वासुदेव भगत व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत …
Read More »कोकण विभागात हिवताप निर्मूलनाचे कार्य उत्तम -डॉ. गौरी राठोड
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभागात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने उत्तम कार्य करून हिवताप आटोक्यात आणला. कोरोना काळातही क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम केले, असे गौरवोद्गार मुंबई मंडळ ठाणे आरोग्य विभागाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड यांनी काढले. जागतिक मलेरिया दिनाचे (25 एप्रिल) औचित्य साधून कोविड काळात विशेष कामगिरी …
Read More »राज्य सरकारविरोधात ऐरोलीत भाजपचे कंदील आंदोलन
नवी मुंबई ः बातमीदार भारनियमनाविरोधात ऐरोली भाजप मंडलच्या वतीने रविवारी (दि. 25) संध्याकाळी कंदील आंदोलन करण्यात आले. भारनियमन व वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय या वेळी जाहीर करण्यात आला. महावितरणाविरोधात विद्युत पुरवठा बंद असलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी केली. …
Read More »तक्का मनपा शाळेत पूर्वतयारी मेळावा; नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या तक्का येथील शाळा क्रमांक 7 मध्ये मंगळवारी (दि. 26) शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी नवविद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांना मार्गदर्शन केले. तक्का येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये शाळा पूर्वतयारी मेळाव्या विविध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper