गुवाहाटी ः वृत्तसंस्था भारताच्या अंडर-19 विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धुलने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा धुल हा दिल्लीचा पहिला आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. यशने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या दिवशी तामिळनाडूविरुद्ध दुसर्या डावात नाबाद 113 धावांची …
Read More »Yearly Archives: 2022
प्रो कबड्डी लीग : यूपी वि. पुणे आज पहिली एलिमिनेटर लढत
बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी (दि. 21) यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण या दोन संघांमध्ये पहिली एलिमिनेटर लढत रंगणार आहे. यांच्यातील विजेता उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सविरुद्ध भिडेल. प्रो कबड्डी लीगच्या अखेरच्या साखळी लढतीत पाटणा पायरेट्सकडून 30-27 अशा पराभवामुळे हरियाणा स्टीलर्सचे आव्हान संपुष्टात आले. याचा फायदा पुणेरी …
Read More »मिशन भ्रष्टाचार निर्मूलन
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते यांचे हेतूच मुळी कमालीचे भिन्न आहेत. भाजपचे आक्रमक नेते भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करतात. लोकांचा पैसा लुटमारीमध्ये कोणाच्या घशात जाण्यापासून रोखतात. करदात्यांच्या पैशाला नको तिथे वाटा फुटण्यापासून वाचवण्याचे हे मिशन आहे. सत्ताधारी नेतेही मिशनप्रमाणेच काम करतात, परंतु त्यांचे मिशन खुर्च्या शाबूत …
Read More »शिवरायांचा आठवावा प्रताप…
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहितीच आहे. आज देखील ह्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणून म्हणतात. तर काही लोक त्यांना मराठ्यांचा अभिमान असेही म्हणतात. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान सेनानायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला.राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न शिवाजी …
Read More »शिरढोण व चिंचवण ग्रामपंचायतीमधील 501 कुटूंबांना विविध वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण व चिंचवण ग्रामपंचायत हद्दीतील 501 कुटूंबांना विविध वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 18) करण्यात आला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन नव विकास योजनेंतर्गत या वस्तूंचे वाटप उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजपचे तालुका अध्यक्ष …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काचे घर; इंग्रजी शिक्षणाचे दारही होणार खुले, विविध विषयांना महासभेची मंजुरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या सहकार्याने पनवेल महापालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे?; कोर्लईतील मालमत्तेवरून किरीट सोमय्यांची चौकशी मागणी
रेवदंडा ः प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी कोर्लईचे सरपंच, शिवसेना कार्यकर्ते म्हणतात इथे बंगले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणत आहेत की माझे बंगले आहेत. खरे कोण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे? असा सवाल करीत याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …
Read More »केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, भारती पवार उद्या पनवेलमध्ये
पनवेल ः केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर असणार आहेत. त्यामध्ये 19 फेब्रुवारीला मुंबई, तर 20 फेब्रुवारीला पनवेल येथील खांदा कॉलनीमधील रिसर्च सेंटरला भेट देणार आहेत. मंत्री महोदय 19 तारखेला मुंबईतील परेल येथील टाटा मेमोरियल सेंटरला भेट देऊन पाहणी व …
Read More »पेण येथे रायगड जिल्हा क्रिकेट निवड चाचणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा वरिष्ठ गटाचा पुरुषांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 व 24 फेब्रुवारी रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. या निवड चाचणीतून निवडण्यात येणारा रायगडचा संघ महाराष्ट्र …
Read More »खालापूर परखंदे येथे दाखले वाटप शिबिर
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील वावोशी मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड विभाजन आणि नवीन नाव नोंदणीसाठी परखंदे आदिवासीवाडीत घेतलेल्या शिबिराला आदिवासी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 200 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शिबिरात जातीच्या दाखल्यांची 57 प्रकरणे तर 69 रेशनकार्डवर नोंदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper