खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर व्यापारी सेल तर्फे बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील खेडेगावातून आलेल्या ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती. भाजपच्या वतीने व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्या सहयोगाने …
Read More »Yearly Archives: 2022
भाजपशिवाय पर्याय नाही -अॅड. महेश मोहिते; मुरूडमधील बहुसंख्य तरुणांचा जाहीर पक्षप्रवेश
मुरूड : प्रतिनिधी भाजप हा जगातील सर्वांत मोठा व शक्तिशाली पक्ष आहे. जनतेला आता विश्वास पटला आहे की, भाजपच विकास करू शकतो. आगामी काळात भाजपशिवाय पर्याय असणार नाही, हे पक्के ठावूक असल्यानेच या पक्षात पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी …
Read More »सागमळा येथे मोफत योग शिबिरास प्रतिसाद
रेवदंडा : प्रतिनिधी पंतजली योग समिती तर्फे योग स्वामीजी रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली सागमळा येथील पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात सात दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत-कोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून शनिवारी सकाळी या योग शिबिरास सुरूवात झाली. यावेळी पंतजली …
Read More »मुरूडमध्ये रंगले कविसंमेलन
मुरूड : प्रतिनिधी कोमसाप मुरूड जंजिरा शाखा आणि अंजुमन डिग्री कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिनानिमित्त अंजुमन डिग्री कॉलेज येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उर्दू विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा आदर वाढवा, भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने हे कवी संमेलन घेण्यात आले. कोमसापचे मुरूड …
Read More »चौकमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात
चौक : रामप्रहर वृत्त येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिरमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यीक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे तर संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या हस्ते सी. व्ही. रमण …
Read More »‘मराठी भाषा जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल’
कर्जत : प्रतिनिधी आपली मायबोली मराठी भाषा आपण जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व व्याख्याते सागर सुर्वे यांनी कर्जतमध्ये केले. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने सेमिनार हॉलमध्ये मराठी राजभाषा दिनाचे आयोजन केले होते. सागर सुर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »नव्या पिढीची ‘ऑनलाइन’ वाटचाल भरकटतेय?
पालक म्हणून आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची. म्हणूनच पालकांची बर्याचदा विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? एसएससी, सीबीएससी की आयसीएससी? …
Read More »क्षुल्लक कारणावरून मुरूडमध्ये पत्नीचा खून
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीमधील खोकरी येथे राहणार्या एका आदिवासी व्यक्तीने जेवण बनविले नाही याचा मनात राग ठेवत आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पती उमेश रमेश वाघमारे (वय 26) याच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपुरी खोकरी परिसरात अब्दुल रहिमान यांचा …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात दोघांचा मृत्यू, 22 जण जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 1) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू, तर 22 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा सहारा सिटी येथून लग्न मंडपाचे साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पो खंडाळा घाटात अंडा पॉइंटजवळ सुरक्षा कठडा तोडून खाली पडला. या वेळी टेम्पोच्या टपावर बसलेले 22 …
Read More »प्रेमात अडसर ठरत असल्याने काटा काढण्याचा प्रयत्न; चौघांना अटक
अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथील मेडिकल दुकानदारावरील गोळीबार हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले. प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. त्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper