जुन्या पुलालाच नवीन साज देण्याचा प्रकार? नागरिकांचा सवाल श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन- दिवेआगर मार्गावरील कोंडीवली गावाजवळ जुनाट पुलाचे अर्धवट बांधकाम ठेवले असल्याचा आरोप नागरिकांमधून केूला जात आहे. जुन्या पुलाचे जीर्ण झालेले आतील भाग तसेच ठेऊन त्यावर जॅकेटवॉल बांधून जुन्या पुलाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल …
Read More »Yearly Archives: 2022
खोपोली अल्टा लॅबोरेटरीज कारखान्यात आग
दोन कामगार गंभीर जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महाराष्ट्रीय महामार्गावरील औषधाची निर्मिती करणार्या अल्टा लेबोरेटरीज कारखान्यात एका प्लांटमध्ये रविवारी (दि. 6) सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तरी दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण मात्र स्पष्ट …
Read More »सोनेवाडी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
पाली : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांच्या तीस वर्षानंतरच्या गेट-टुगेदरने आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीचे अविस्मरणीय क्षण तसेच सुंदर आठवणी बालपणात घेऊन गेलेले क्षण या वेळी अनुभवायास मिळाले. पालीतील दीपा लक्ष्मण काळे व राजेश्री चौधरी यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बालपणीचे 18 मित्र एकत्र आले व त्यांनी धम्माल …
Read More »कर्जतमधील फार्मसी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ
कर्जत : प्रतिनिधी कर्जतमधील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दीक्षांत समारंभ उत्साहात सम्पन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि जण गण मन या आपल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची …
Read More »खारेपाटामधील भुवनेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा
खारेपाट ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील खारेपाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या पुरातन श्री भुवनेश्वर मंदिराला शासनाच्या पर्यटन विकास विभागातर्फे पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री भुवनेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला …
Read More »शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंना रायगड भूषण पुरस्कार
अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबाग येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या चार खेळाडूंना विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रविवारी (दि. 6) रायगड जिल्ह्यातील मानाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ही संस्था गेल्या 30 वर्षांपासून डॉ. मंदार पनवेलकरयांच्या अध्यक्षतेखाली मार्शल आर्टस् मधील विविध …
Read More »बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी
-संदीप भूशेट्टी, sbhushetty@gmail.com शेअर बाजारात युद्धाच्या वातावरणामुळे सध्या होत असलेली घसरण ही गुंतवणूकदारांना घाबरवून टाकणारी असली तरी गुंतवणुकीला तेव्हाच चांगली फळे येतात, जेव्हा ती अशा मोठ्या चढउतारांत ताऊन सुलाखून निघते. त्यामुळे या पडझडीतही गुंतवणूकदारांनी धीर धरून गुंतवणुकीतील सातत्याला धक्का बसू देता कामा नये. कोरोनाचे संकट कमी झाल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत …
Read More »तेलसंकट ही एकत्र येऊन जागरूकता वाढविण्याची संधी
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्वपदावर येत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत रशिया – युक्रेन संघर्षाने पुन्हा तणाव निर्माण केला आहे. तेलाची दरवाढ हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. तेलाच्या आयातीला सध्या तरी पर्याय नसला तरी त्याच्या अतिरेकी वापरावर काही निर्बंध आणि तेल वापराविषयी सर्वव्यापी जागरूकतेची आज गरज आहे. कोरोना …
Read More »शिक्षणाच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले
मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे यांनी केल्या भावना व्यक्त नवी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रयतेच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने शेतसारा भरणारे करावे गाव, शिक्षणातही पुढेच होते. सुमारे 101 वर्षांपूर्वी शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. अशा ज्ञानरुपी शाळेचा मी मुख्यध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याच्या भावना व्यंकटेश कांबळे यांनी …
Read More »स्वर्गीय संजय भोपी पुण्यस्मरणदिनी धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील स्वर्गीय संजय दिनकर भोपी यांच्या प्रथम स्मृतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय संजय भोपी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) प्रथम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper