Breaking News

Monthly Archives: November 2023

पनवेलमध्ये शनिवारी सुरेल ’दिवाळी पहाट’

प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गाण्यांची मैफिल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) पहाटे 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. …

Read More »

प्रामाणिक प्रयत्न सुरूच

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात उभे राहिलेले वादळ फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शमवू शकतात याबाबत एव्हाना सर्वांचीच खात्री पटलेली असेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल याकरिता सरकारी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली आहे. गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या प्रश्नी मराठा समाजाने मोर्चे, आंदोलने असे शांततापूर्ण मार्ग …

Read More »

राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजारांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

‘रामप्रहर’चा सायबर क्राईमवर आधारित दिवाळी अंक जनजागृतीसाठी उपयुक्त ठरेल

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा व जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहरचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन समारंभात बोलत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या …

Read More »

केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त -आमदार प्रशांत ठाकूर

खारघर येथील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित ’भारत सरकार : नऊ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) झाले. या …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्‍या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 7, 8, 9 डिसेंबर रोजी पनवेल …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे यश ; विचुंबेत शेकापचा दारुण पराभव; न्हावे ग्रामपंचायतही युतीकडे

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विरोधकांना धूळ चारली आहे. शेकापसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत भाजप महायुतीने बाजी मारली. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष …

Read More »

पनवेल, उरण तालुक्यात शांततेत मतदान

थेट सरपंचांसह सदस्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात मुदत संपलेल्या 17 ग्रामपंचायतींसाठी तर उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. पनवेल व उरण तालुक्यात मतदान प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आता सोमवारी (दि. 6) मतमोजणी होणार असल्याने सर्वत्र उत्सुकता वाढली आहे. पनवेल तालुक्यातील …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; सोमवारी मतमोजणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) 177 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सदस्यपदाच्या 3395 व सरपंचपदाच्या 485 अशा एकूण 3880 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार आहे. रायगडात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, …

Read More »

चित्रपट महोत्सवांचे रंगढंग…

चित्रपट महोत्सव म्हणजे एक प्रकारची जत्राच. मराठी व हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील तसेच देशविदेशातील जुने नवे चित्रपट पाहण्याची संधी, जुने चित्रपट म्हणजे आठवणींना उजाळा, ’फ्लॅशबॅक’मध्ये डोक्यावण्याची संधी, एक ’उत्सवी माहौल’. अनेक गोष्टींचे निरीक्षण, लहान मोठ्या भेटीगाठी, जुनी दुर्मीळ पोस्टर्स पाहण्याचा योग, या निमित्तानाची पुस्तिका, त्यांचे वाचन आणि लहान मोठ्या अनेक …

Read More »