कराड : रामप्रहर वृत्त लढवय्ये नेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर आयुष्यात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 17) कराड येथे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात …
Read More »Yearly Archives: 2023
उंबर्डेत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर उंबर्डे गावच्या हद्दीत पायी जाणार्या पादचार्याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. फिर्यादी अंकुश बाळाजी लांगी (47) रा, रोडे, कांदळेपाडा ता.पेण यांचे वडील बाळाजी पोशा लांगी (वय 65) हे मंगळवार …
Read More »विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाचगणी आदिवासी वाडीतील तरुणाचा पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथे एका खासगी बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, पेण तालुक्यातील पाचगणी डोंगराळ भागात असणारी काही आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराच्या आजूबाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. अंतोरे फाटा येथेही …
Read More »रोहा येथे अवैध गांजा पकडला
विक्रेत्याला पकडले पोलीस ठाण्यात गुन्हा रोहा : प्रतिनिधी रोहा शहरातील रोहा चणेरा मार्गावरील म्हाडा कॉलनीतील एका बंद इमारतीमध्ये गांजा विक्रीस आणलेल्या विक्रेत्याला रोहा पोलिसांनी पकडले आहे. रोहा पोलिसांनी त्या गांजा विक्रेत्याकडून 19 हजार 56 रुपयाचा गांजा जप्त केला आहे.रोहा पोलिसांची अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू असून या अंतर्गत अवैध …
Read More »सफाई कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील स्थिती वेतन न दिल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ माणगांव : प्रतिनिधी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून माणगांव शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय शंभर खाटांचे असून दक्षिण रायगडमधील हजारो नागरिक या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात सफाई, धुलाई, आहार अशा अनेक सेवा ठेकेदारामार्फत पुरविल्या जातात. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत
विविध विकासकामांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) मुंबईत येत आहेत. या दौर्यात वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधानांना हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान …
Read More »स्वच्छता अभियानात नागरिकांचा खारीचा वाटाफ
नेरूळमध्ये रहिवाश्यांनी केली परिसराची साफसफाई नवी मुंबई : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असेल तरच आपल्या प्रभागासह शहराचेदेखील नाव उंचावले जाते. हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेरूळ सेक्टर 2 मधील इंद्रधनुष्य अपार्टमेंटसह स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असूनदेखील …
Read More »ट्रकच्या चाकाखाली येऊन 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर ठाणे येथून कळंबोली येथील रेल्वे यार्डमध्ये जाणार्या 12 चाकी बल्कर ट्रकच्या पाठीमागील चाकामध्ये आल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंब्रा-पनवेल मार्गावर फुडलँड कंपनीजवळ घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघातातील ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून राजपत्रात त्याला ताब्यात घेतले आहे. नालासोपारा येथे राहणारा ट्रकचालक राजेश यादव हा रविवारी …
Read More »उत्तरप्रदेशात खून करून फरार झालेल्या चौघांना खारघरमध्ये बेड्या
पनवेल : वार्ताहर उत्तरप्रदेश राज्यातील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक करून त्यांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी देल्हूपूर पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगढ मधील देल्हूपूर पोलीस ठाणे हद्दीत …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो पुमसे स्पर्धेत रायगडला सांघिक अजिंक्यपद
मोहोपाडा : प्रतिनिधी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने अहमदनगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने एकूण 21 पदके मिळवून 1931 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयोगटांमधील सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सीनिअर अशा वयोगटांत वैयक्तिक पुरुष व महिला, मिश्र …
Read More »