Breaking News

Monthly Archives: April 2024

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा …

Read More »

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुतीच्या उमेदवार …

Read More »

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी (दि. 18) आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. यानिमित्ताने महायुतीने अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अलिबाग-रेवदंडा बायपास येथे चिंतामणराव केळकर विद्यालयासमोरील मैदानात महायुतीची …

Read More »

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत, तर सोमवारी पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. …

Read More »

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय समिती बैठक सोमवारी (दि.15) कर्जतमधील साईकृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी खासदार बारणे यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करताना स्वतःची काळजी घ्यावी. …

Read More »

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनिन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सरपंच नाजनिन पटेल यांच्या विरोधात 10 मते, तर बाजूने केवळ तीन मते पडली. गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलिकडे काही वर्षे ठाकरे गट …

Read More »

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या 75 झोपड्यांवर कारवाई करून त्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेने ही कारवाई करीत नागरिकांना मोठा दिलासा आहे. बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे रामदास शेवाळे, परेश पाटील यांच्या प्रमुख …

Read More »

बीसीटी कॉलेजचा वार्षिक महोत्सव उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेज (बीसीटी)चा वार्षिक महोत्सव 10 ते 13 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे संस्थेचे व्हाईस चेअरमन …

Read More »

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे समन्वयक म्हणून आलेले आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले. या वेळी व्यासपिठावर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …

Read More »