Breaking News

Monthly Archives: September 2024

‘रोटरी’तर्फे पनवेलमध्ये कापसे पैठणीचे प्रदर्शन व विक्री

वर्षा ठाकूर, शुभांगी घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त थेट विणकर ते ग्राहक विक्री अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे महिलावर्गासाठी पनवेलमध्ये प्रथमच खास येवला येथील कापसे पैठणीचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 27) वर्षा प्रशांत ठाकूर आणि शुभांगी महेंद्र घरत …

Read More »

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर लोकमत लोकनेता पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना गुरुवारी (दि. 26) लोकमत लोकनेता सन्मान पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे वने …

Read More »

विवेक पाटीलांचा जामीन अर्ज पनवेल न्यायालयाने फेटाळला

पैसे परत न मिळालेल्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज पनवेलचे जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची सुटका होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेकाप पुढारी …

Read More »

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन तालुक्यातील चिंचवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तुंग झेप घ्या -लोकनेते रामशेठ ठाकूर

न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनात यशाची उत्तुंग झेप घ्यावी, असा यशोमंत्र रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी (दि. 25) आयोजित 137व्या कर्मवीर …

Read More »

हुतात्मा नाग्या कातकरी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिवादन

उरण : प्रतिनिधी चिरनेर आक्कादेवी कातकरीवाडी येथील 25 सप्टेंबर 1930 झाली झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी इंग्रज सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असेे गौरोदगार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.25) काढले. वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीन विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे एक कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बुधवारी (दि. 25) झाला. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व …

Read More »

आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा -सुलक्षणा सावंत

पनवेल ः रामप्रहर वृत्त लाडकी बहीण योजनेसह लोकहिताच्या अनेक योजना राज्यात सुरू आहेत. या योजना अशाच सुरू राहण्यासाठी राज्यात विद्यमान भाजप महायुतीचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी आपली ताकद येत्या विधानसभा निवडणुकीतही लावून आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी आणि गोवा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलच्या ग्रामीण भागात विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे एक कोटी 30 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी (दि. 24) झाला. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. ही सर्व कामे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध निधींमधून करण्यात …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात कर्मवीर जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी (दि. 24) डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाविद्यालयात कर्मवीर सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम झाले. कर्मवीर जयंतीच्या मुख्य …

Read More »