नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांचा दृष्टिकोन विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातिपातीविरहित शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळेच …
Read More »Yearly Archives: 2024
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्री
नवी मुंबई ः बातमीदार सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर माझी सही झाली असून काही दिवसांत अध्यादेश जारी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 22) केली. ते ऐरोली येथे साकारण्यात येत असलेल्या कोळी भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान …
Read More »कृत्रिम हातपाय बसविण्याचे शिबिर यशस्वी
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याचे शिबिर मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 22) झाले. मोफत कृत्रिम हात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा ‘रयत’कडून गौरव
विद्यमान शैक्षणिक वर्षात सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी सातारा ः रामप्रहर वृत्त समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक दायित्व बजावणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार, लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा …
Read More »काही रिपीट रन भारीच गाजले…
अलबेला 1951चा पिक्चर. सी. रामचंद्र यांच्या संगीतातील भोली सुरत दिल के खोटे, शोला जो भडके दिल मेरा धडके, श्याम ढले खिडकी तले ही गाणी हिट होता होता डॉ. भडकमकर मार्गावरील (तेव्हाचा लॅमिंग्टन रोड) इंपिरियल थिएटरमधील गर्दी वाढत वाढत गेली आणि मा. भगवान विलक्षण सुखावले. या चित्रपटाच्या यशाने मा. भगवान आणि …
Read More »खालापुरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत चौक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाची सर्वसमावेशक कार्यप्रणाली आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या विकासकार्यावर आकर्षित होऊन अनेकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे. यालाच अनुसरून खालापूर तालुक्यातील चौक तारापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आणि वावर्ले येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …
Read More »पनवेलमध्ये रविवारी जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. मोफत कृत्रिम हात …
Read More »पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी …
Read More »विकासकामांमुळे जनता नक्की साथ देईल -आमदार महेश बालदी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर गेल्या पाच वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावात, वाड्या-वस्त्यांवर विकासाचा निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर व उमद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू. जनता मला नक्की साथ देईल, असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 20) व्यक्त …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुका व …
Read More »