Breaking News

Yearly Archives: 2024

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा मेळाव्यात निर्धार

उरण ः रामप्रहर वृत्त आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा रविवारी …

Read More »

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उरण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे बंदर उभारणीच्या कामाला गती देण्यात येत असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करंजा मच्छीमार बंदरासाठी आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांना पूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय या ठिकाणी अत्याधुनिक …

Read More »

उरण येथे रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

उरण ः प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने उरण नगर परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि नवीन विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 1) दुपारी 3 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा उरण येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नारायण (नानासाहेब) विष्णू धर्माधिकारी नगर परिषद मराठी शाळा, पेन्शनर्स …

Read More »

‘हाथ की सफाई’ @ 50 वर्षे

राज कपूरच्या ‘दो उस्ताद’च्या रिमेकमध्ये रणधीर कपूर रंगला दिग्दर्शक प्रकाश मेहरा याने ‘हाथ की सफाई’ (1974)चे शूटिंग सुरू होण्याअगोदर रणधीर कपूरसाठी हा चित्रपट ज्या चित्रपटाची रिमेक आहे त्या तारा हरीश दिग्दर्शित दो उस्ताद (1959) या चित्रपटाच्या खास ट्रायलचे आयोजन केले त्याचा हा गाजलेला रंगतदार किस्सा. या पिक्चरमध्ये रणधीर कपूरला नेमके …

Read More »

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकारिता क्षेत्र जनमानसाचा आरसा आहे. पत्रकारिता अत्यंत मानाचे असे क्षेत्र आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची भूमिका आणि त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीन, अशी ग्वाही पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. पत्रकार …

Read More »

पनवेलमध्ये सावित्रीच्या लेकींचा पुरस्काराने सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दैनिक लोकमत वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल परिसरातील विविध क्षेत्रांमधील कर्तृत्ववान महिलांचा शुक्रवारी (दि. 30) आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. …

Read More »

कुष्ठपीडितांच्या मी नेहमी पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या रूपाने आपल्या संघटनेच्या आणि समाजाच्या मागण्यांची पूर्तता नक्कीच होत असते, परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज भासेल त्या त्या वेळेस मी आपल्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …

Read More »

पनवेलच्या पाणी प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी प्रश्नावर गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एमजीपीचे उपकार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता वायदंडे, सिडकोचे कार्यकारी अभियंता गायकवाड आणि …

Read More »

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला बैठकीत आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समितीची आढावा बैठक गुरुवारी (दि. 29) महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या योजनेबरोबरच राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारी आम्ही सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दै. लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 30) पनवेलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …

Read More »