लोकसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आटोपले असून एकूण परिणाम घोषित होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध इतर जवळजवळ सर्व पक्ष असे हे विषम युद्ध आहे. भाजप सत्तेवर येणारच असेल तर मोदींऐवजी दुसरा कोणीतरी मऊ भाजपवाला पंतप्रधान व्हावा म्हणूंनही हितसंबंधी शक्तींकडून फासे टाकण्यास सुरवात …
Read More »खालापुरात पाणीबाणी
पनवेल, उरण, पेण, कर्जत व खालापूर हे तालुके देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईस शेजारी तर नव्याने विकसित केलेल्या नवी मुंबईच्या लगत असणारे तालुके विकसनशील म्हणून नावारूपास येत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण तसेच काही तालुक्यांत शेतीसह इतर व्यवसाय सुरु असल्याने आर्थिक सुबत्ता या परिसरात नांदत आहे. मात्र मागील काही …
Read More »धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र दामोदरदास मोदी ही तीन व्यक्तिमत्व या हिंदुस्थानात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व व त्यांची परिभाषा सारखीच आहे. भारत हा हिंदुस्थान आहे आणि त्याचा हिंदुस्थान हा नामोच्चार सर्रास करण्यात येतो. अगदी शरदचंद्र …
Read More »आयपीएलने भारतीय संघाला काय दिले?
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) नुकतीच संपली. येत्या काही दिवसात इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांचा सराव मिळावा यासाठी इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्टइंडिज यांसारखे देश एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळत आहेत. भारतीय खेळाडू मात्र आयपीएलमध्ये ट्वेंटी-20 सामने खेळत होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी ज्या 15 खेळाडूंची भारतीय …
Read More »आयोगाच्या संयमाची परीक्षा
संपूर्ण देशभरात काही तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. अखेरच्या टप्प्यातील हा हिंसाचार टाळण्याची खबरदारी खरे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घ्यायला हवी होती. परंतु त्यांनी सुरूवातीपासूनच अडवणुकीचे धोरण अनुसरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ आदींच्या सभांना त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. …
Read More »कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा …
Read More »बळीराजाला आधार हवा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह रूप धारण करत चाललेली असतानाच, स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवसांनी लांबणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भीषण पाणीटंचाईच्या तोंडावर पावसाचा तीन-चार दिवसांचा विलंबही अडचणींमध्ये प्रचंड भर टाकणारा भासतो. एकंदर परिस्थिती चिंतेत भर टाकणारी असताना शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातली आकडेवारी मात्र निश्चितपणे धीर …
Read More »पनवेल एसटी आगार कामाच्या प्रतिक्षेत…
गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगारप्रमाणे पनवेलचे एस.टी. आगार बांधणार असे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते या बसपोर्ट मध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष. दुसर्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले आहे. या कामाची …
Read More »कॅन्सरचा वाढता विळखा
प्रवाशाची वाट पाहताना विरंगुळा म्हणून सोबतच्या अन्य एखाद्या रिक्षाचालकाने सहज देऊ केलेल्या तंबाखू वा गुटख्यातून जडणारी ही सवय व्यसनात कधी परिवर्तित होते ते बहुदा कुणाच्याच ध्यानात येत नाही. वेळेवर जेवण मिळत नसल्याने भूक मारण्यासाठी, प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, कुटुंबापासून दूर राहताना जाणवणार्या एकाकीपणापासून स्वत:ला सावरताना किंवा जगण्याच्या सगळ्याच विवंचना घडीभर विसरण्यासाठी …
Read More »मी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे !!
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशात आणि मुंबई प्रांतावर कॉग्रेसच सरकार होत. मुंबई सह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र अस हे मुंबई इलाक्याच नाव होत. मराठीची गळचेपी आणि संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन पेटल तेच मुळात त्यावेळच्या कॉग्रेस सत्तेच्या विरोधात. हे आंदोलन दडपण्याचा आणि ठेचुन काढण्याचा सर्वोतोपरी प्रतत्न मोरारजी देसाई आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी …
Read More »