Breaking News

संपादकीय

रागाची कारणमीमांसा

मोबाइलच्या अतिवापराची परिणती वाढत्या रागात होते आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुन्हा पुन्हा मोबाइलच्या अशातर्‍हेने व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार्‍या परिणामांकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. रागाच्या भरात होणार्‍या या गंभीर गुन्ह्यांचा मानसोपचार तज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निश्चितच दिसते आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सोमवारी एका 13 वर्षांच्या मुलाने    आपल्या 30 वर्षीय …

Read More »

नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको …

Read More »

अखंड प्रेरणास्रोत

देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड …

Read More »

नवभारताचे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक अनुकूलता, नैसर्गिक संपन्नता आणि विविधतेतील एकता अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला आपला भारत देश जगाला हेवा वाटावा असाच आहे, मात्र असे असूनही आपल्या देशाला जागतिक स्तरावर हवा तसा मान-सन्मान मिळत नव्हता. किंबहुना भारताला नेहमीच दुय्यम स्थान मिळत असे. आज जगभरात भारताच्या यशाचे, विकासाचे अन् प्रगतीचे गोडवे गायले जात …

Read More »

31 वर्षांचा विक्रम मोडणारा पाऊस

माथ्यावरील रान अशी बिरुदावली असलेलं माथेरान हे रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ असून डोंगरमाथ्यावर उंच हिरवीगार घनदाट वनराई असल्यामुळे येथे प्रतिवर्षी जोरदार पाऊस बरसतो, पण यावर्षी वरुणराजाने माथेरानकरांवर जास्तच मेहेरबानी केली. 27 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल सात हजार 71 मिलिमीटरपर्यंत मजल मारली. मागील 31 वर्षांत इतका पाऊस कधीच …

Read More »

धाक वाटायलाच हवा

हिरोगिरी करताना अपघात होऊन बळी जाणारी तरुण मुले, मद्यधुंद अवस्थेत रात्री-अपरात्री बेदरकारपणे मोटारी पळवून स्वत:च्या वा इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी धनिकांची बाळे यांना चांगली जरब बसेल अशा मोटार वाहन कायद्याची गरज अर्थातच होती आणि त्या दृष्टीने हा नवा मोटार वाहन कायदा निश्चितपणे प्रभावी ठरेल याविषयी शंका नाही. वाहतूक नियमभंगासाठी केंद्र …

Read More »

पुरस्कार

त्या तिघांना एका संस्थेतर्फे पुरस्कार मिळणार होते. ते  खास गाडी करून मुंबईला निघाले. संस्थेने दिलेल्या पत्त्यावर ते पोहचले. त्या ठिकाणी कोणीच नव्हते. तासभर थांबल्यावर त्या ठिकाणी दोन-तीन कार्यकर्ते आले. त्यांनी हॉल उघडला. तयारी सुरू केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर प्रमुख पाहुणे उशिरा येणार असल्याने कार्यक्रम उशिरा सुरू होणार असल्याचे त्यांना समजले. …

Read More »

ना. धों. महानोरांच्या रानातल्या कविता

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांची गाणी झाली आणि ती गोडी तरुणाईच्या ओठी आली. असं भाग्य काही मोजक्याच कवींच्या नशिबी येतं. ना. धों.च्या कविता रानातल्या, ज्या पध्दतीने दिसतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. इथली जमीन, इथला निसर्ग, इथली शेती, इथला राघू, इथल्या ज्वारीतील यौवन. जे दिसलं तसं. त्यांच्या कवितांत शृंगार आहे, …

Read More »

भाजपमध्ये चैतन्याची लाट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती असताना पनवेल, उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपतील पक्षप्रवेश, बूथ कार्यकर्ता संमेलने, विधानसभा मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. विविध विकासकामांचा पाऊस पडत आहे. भाजपत येणार्‍यांचा ओघ वाढत आहे. रविवारी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. …

Read More »

मेगाभरती आणि मेगागळती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. रणसंग्रामाचा बिगूल वाजण्याआधीच पक्षांतराची धामधूम जोरात असून, विरोधी पक्षांतील अनेक बडे नेते सत्ताधार्‍यांकडे विशेषत: भाजपकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांचा हा परिपाक आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सलग दुसर्‍यांदा सत्तेवर आले आणि …

Read More »