Breaking News

संपादकीय

मनसेचा फटका कुणाला..?

चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्‍या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्‍यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले …

Read More »

मोबाईल सांभाळा, अन्यथा पडेल अब्रुवर घाला

हॅलो, हॅलो… सारख्या सारख्या मिस्कॉलने नम्रताचे (नाव बदलले आहे) मानसिक संतुलन बिघडले होते. सकाळी, संध्याकाळी, बाथरूममध्ये कुठेही अगदी झोपेच्या वेळीही मोबाईलची रिंगटोन ‘कहो ना प्यार है’, कानावर पडत असे. एकदोनदा त्या अनोळखी फोनवर आलेले कॉल नम्रताने उचललेही होते. काही कॉल घरचे किंवा सासरचे असतील असा भास झाल्याने नम्रताने फोन उचललेही …

Read More »

विकास आणि राष्ट्रवादाचा विजय, नकारात्मकतेला मूठमाती

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी 10 मार्च 2019 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या 17व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि संपूर्ण देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आले. 19 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह 59 मतदारसंघात सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे 2019 …

Read More »

विद्यार्थ्यांनी सुट्टीत करा कौशल्यवर्धन

जगात चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते. कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खर्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ती म्हणजे पैसा नव्हे तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ स्किल्ड मॅनपॉवर. अलीकडील काळातील बेरोजगारीचे वास्तव लक्षात घेतले तर असे दिसून येईल की, …

Read More »

मोदी पर्व पुन्हा सुरू

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राजबिंड्या राजपुत्रापेक्षा तळागाळातून परिस्थितीशी झगडत ध्येयनिष्ठेने प्रेरित होऊन स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर देशातील सर्वोच्च सत्तास्थानी विराजमान झालेले मोदी लोकांना अधिक जवळचे, विश्वासपात्र व विसंबून राहण्याजोगे वाटतात. याखेरीज आणखी एका घटकामुळे लोकांना मोदी हाच उत्तम पर्याय आहे असे ठामपणाने वाटते. ती म्हणजे, राजकीय अस्थिरतेची भीती. कोटी …

Read More »

देश मोदींच्या पाठिशी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली आणि  अवघ्या दोन तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याची दारुण स्थिती दुपारपासूनच दिसू लागली. देशभरातील जनतेकरिता देशाची अस्मिता, …

Read More »

विंचूदंश विषयक सूचनांचे पालन होण्याची गरज

पोलादपूर तालुक्यात भातशेतीची कापणी सुरू झाली असताना विंचूदंशाने बाधित रूग्णांची संख्या वाढली असून पावसाळयापूवीर अनेक रूग्ण ग्रामीण रूग्णालयामध्ये होत असतात. दरम्यान, महाड येथील जागतिक किर्तीचे विंचूदंश उपचारपध्दतीचे संशोधक डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी दिलेल्या सूचनांचे पोलादपूरच्या ग्रामीण भागात पालन होण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यात कार्तिकी एकादशीपूर्वीच भातशेती कापणीला सुरूवात झाली …

Read More »

विरोधकांचा रडीचा डाव

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील मतपावत्यांची मोजणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आपली व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीची मागणी अखेरपर्यंत लावून धरली. मतमोजणीच्या आधी मतपावत्या पडताळल्या जाव्यात ही विरोधकांची मागणीही आयोगाने अखेर बुधवारी फेटाळून लावली. भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

आजी-आजोबांसाठीचा ‘आनंदोत्सव’

एप्रिल ते जून महिन्यात जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे  आज घरात वृध्द माणूस म्हणजे अडचण वाटू लागले आहेत. परदेशात राहणार्‍या मुलांना आपल्या आई-वडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने माहीत नसल्याच्या किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हॉट्सअपवर दाखवा सांगणार्‍या आजच्या तरूणांच्या  …

Read More »

विवेकने जबाबदारी ओळखावी

सार्वजनिक जीवनात वावरणे सोपे नसते. चित्रपट-क्रीडा या क्षेत्रातील अनेक मंडळी फार सहजपणे राजकारणाकडे वळत असतात. त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय असते, त्यामुळे जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांची मदत होईल या हेतूने राजकीय पक्ष त्यांना सहजपणे सामावून घेतही असतात. पण कैकदा या मंडळींच्या ठायी राजकारण-समाजकारण करताना आवश्यक असणारी प्रगल्भता दिसून येत नाही. अभिनेता …

Read More »