न्यूयॉर्क : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला आहे. गौरवाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी …
Read More »आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पॅन आणि आधार क्रमांक 30 सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही, तर 1 ऑक्टोबरपासून पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होईल. याआधी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही, तर ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाईल, असा नियम होता. पॅन कार्ड इनव्हॅलिड (अमान्य) म्हणजेच, तुमच्याकडे पॅन कार्ड …
Read More »केंद्र सरकारी कर्मचार्यांना खूशखबर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 मधील 54 व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. 1 …
Read More »सातार्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच!
सातारा : प्रतिनिधी उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खासदारपदासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरलाच सातार्यात मतदान होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातार्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपत गेल्यानंतर …
Read More »ऑस्ट्रेलियात सुपर ओव्हरचा नियम बदलला
दुबई : वृत्तसंस्था बिग बॅश लीगमध्ये सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या नव्या नियमाबाबत माहिती दिली. सरत्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला त्या वेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांची धावसंख्या समानच …
Read More »सहकार्यांनो, जोखीम पत्करा! कर्णधार विराट कोहलीकडून निडर बनण्याचा सल्ला
बंगळुरू : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तिसर्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील सहकार्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ’तुम्ही सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करावी. जोखीम पत्करल्याशिवाय संघ निडर होऊच शकत नाही,’ असे विराटने म्हटले आहे. आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणार्या विराटला एम. …
Read More »नरेंद्र मोदींनी मने जिंकली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिका दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचे दर्शन ह्यूस्टनमध्ये घडले. विमानतळावर मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचे मोदींच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींची ऊर्जा क्षेत्रातील सीईओंसोबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी …
Read More »कलम 370बाबत गैरसमज पसरवला ; जे. पी. नड्डा यांचा बंगळुरूत विरोधकांवर घणाघात
बंगळूरू ः वृत्तसंस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. बंगळूरूमधील एका कार्यक्रमाप्रसंगी नड्डा यांनी म्हटले की, कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजूने …
Read More »दिवाळीआधी निवडणुकीचा बार
महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वांना उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, दोन्ही निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी (दि. …
Read More »गुड न्यूज! कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात
पणजी : वृत्तसंस्था अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत दिली. कोणतीही सवलत न घेणार्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले …
Read More »