Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

भारताने रचला इतिहास!, मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम

पुणे : प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथील दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम केला आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभूत …

Read More »

महायुतीच्या विजयाचा संकल्प करा ः शहा

कोल्हापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी (दि. 13) येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. …

Read More »

शंभर कोल्हे आले, तरी सिंहाची शिकार होत नाही -मुख्यमंत्री

नागपूर : प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आता सर्वच पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पहिली सभा पार पडली. या वेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. शंभर कोल्हे जरी एकत्र आले तरी सिंहाची शिकार …

Read More »

‘भारत-चीन संबंधातील नवे युग सुरू’

मामल्लापुरम : वृत्तसंस्था ‘चेन्नई कनेक्ट’द्वारे भारत आणि चीन यांच्या संबंधांतील नवे युग सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत विविध सत्रांमध्ये सुमारे साडेपाच तास चर्चा केली. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांबाबत शनिवारी मोदी यांनी भूमिका व्यक्त केली. अनौपचारिक बैठकीत मोदी …

Read More »

2014ला ट्रेलर पाहिला; आता पूर्ण सिनेमा पाहा -पंतप्रधान

भंडारा : प्रतिनिधी फोडा आणि तोडाचं राजकारण हा भूतकाळ झाला आहे. याचा ट्रेलर 2014ला पाहिला. आता या निवडणुकीत तुम्ही पूर्ण सिनेमा दाखवणार आहात. जो काम करणार त्यालाच तुमचा विश्वास मिळणार, हे आता सिद्ध झालं आहे, असा विश्वास मतदारांवर टाकत मोदींनी पुन्हा एकवार स्थिर सरकार निवडून देण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

थकलेले साथीदार आधार देऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदींचे काँग्रेेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र

जळगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 13) जळगावमधील प्रचारसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेले पक्ष : उदयनराजे भोसले

पाटण ः प्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना, भाजप, रिपाइं व महायुतीचीच सत्ता येणार …

Read More »

शरद पवारांनी माझा अनुभव घेतलेला नाही -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्‍यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा …

Read More »

‘महाराष्ट्राची क्रमांक एकच्या दिशेने वाटचाल’

जत (सांगली) : प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकर्‍या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनात आघाडीवर होता, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून, हे राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय …

Read More »

शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलरसारखी : मुख्यमंत्री

फलटण : आज निवडणूक समोर असताना काँग्रेस नेते राहुल गांधींना ठाऊक आहे की काँग्रेस हरणार. त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत, तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ, असे पवार म्हणत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही, …

Read More »