मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले …
Read More »जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विठ्ठलाकडे प्रार्थना नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 1) विठ्ठलाकडे केली. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी जय जय पांडुरंग हरी म्हणत मराठीतून सर्वांना आषाढी एकदशीच्या शुभेच्छा दिल्या.आषाढी एकदशी म्हटली की डोळ्यांसमोर येते गजबजलेले पंढरपूर, वारकर्यांच्या …
Read More »तरुणीवर सामूहिक बलात्कार; वर्धा हादरले
वर्धा ः प्रतिनिधी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा …
Read More »पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रदक्षिणा मार्ग होणार सील
पंढरपूर ः प्रतिनिधी आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे 29 जून ते 2 जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र आता प्रदक्षिणा …
Read More »भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना चोख प्रत्युत्तर; पंतप्रधानांचा ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, …
Read More »देशाच्या संरक्षण मुद्द्यावर राजकारण करू नका!
शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान सातारा : प्रतिनिधीभारत-चीनदरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडले होते, याचाही विचार केला पाहिजे. 1962च्या युद्धानंतर चीनने भारताचा 45 हजार …
Read More »इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीस …
Read More »देशातील कोरोना रुग्ण पाच लाखांवर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी (दि. 27) संपलेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख आठ हजार 953 इतकी झाली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत …
Read More »‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
सातारा : प्रतिनिधी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या सातार्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार आणि चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची शनिवारी (दि. 27) फेरनिवड झाली, तर संस्थेचे सचिव म्हणून वाशी (नवी मुंबई) येथील डॉ. कर्मवीर भाऊराव …
Read More »सोशल डिस्टन्सिंग, मास्क अनिवार्य : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशांतील सरकारे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणीदेखील अनेक देशांत करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल तसेच मास्कचा वापर करीत राहावा लागेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »