Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका

नौदल प्रमुखांचा इशारा नवी दिल्ली ः समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होऊ शकतो. समुद्रातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असा इशारा भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला. दिल्लीमध्ये इंडो-पॅसिफिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुलवामा दहशतवादी हल्ला कट्टरपंथीयांनी घडवून आणला. त्यांना अधिकृत यंत्रणांची मदत होती. भारताला अस्थिर करण्याचा …

Read More »

‘ते माझ्यावर, तर मी दहशतवाद्यावर स्ट्राईक करतो’

पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात गांधीनगर ः एकीकडे विरोधी पक्ष मोदी हटावचे नारे देत असताना लोकांच्या बळावर मी लोकहिताच्या निर्णयावर ठाम आहे. ते मोदीवर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात, तर मोदी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचा …

Read More »

कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांचे गंगास्नान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या  कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य …

Read More »

लक्ष्यावर हल्ला चढवणं हेच फक्त आमचं काम

हवाई दल प्रमुखांनी खडसावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सरकारने पुराव्यासकट जाहीर करावे, अशी मागणी होत असतानाच याबाबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती …

Read More »

पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे ः प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका दाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी आरोपी अमोल भगवान बलखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित 20 वर्षीय महिला ही घराच्या पाठीमागे तात्पुरत्या स्वरूपात …

Read More »

अफूची शेती करणारे दोघे अटकेत

दौंड ः प्रतिनिधी मलठण येथे अफूची शेती करणार्‍या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या शेतातून अंदाजे साडेसात लाख रुपयांची अफूची रोपे ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. या प्रकरणी संतोष अण्णा ढवळे (48) आणि विकास झुंबर ढवळे (27, दोघेही रा. हिंगणीबिर्डी, ता. दौंड) यांना …

Read More »

इराणची पाकमध्ये घुसून कारवाई करण्याची धमकी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर आता इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. भारताप्रमाणे इराणही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी त्रस्त आहे. पाकिस्तानातून इराणविरोधी दहशतवादी कारवाया चालतात. पाकिस्तान या दहशतवादी गटांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराणच्या सरकारने आणि सशस्त्र दलांनी …

Read More »

‘अभिनंदन यांचे पुन्हा कॉकपीटमध्ये जाणे फिटनेसवर अवलंबून’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे फायटर वैमानिक म्हणून पुन्हा रुजू होणे त्यांच्या वैद्यकीय फिटनेसवर अवलंबून आहे, असे हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सोमवारी सांगितले. विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारीच पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना …

Read More »

आधुनिक एके-203 रायफलींची अमेठीत होणार निर्मिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात रशियाच्या सहकार्याने एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केली. पंतप्रधान मोदींचे प्रयत्न आणि रशियाच्या सहकार्यामुळे अमेठीत …

Read More »

‘जैश’चा म्होरक्या मसूदचा मृत्यू?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार 2 मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे, मात्र टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत …

Read More »