Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

देशात लहान मुलांच्या लसीकरणाला येणार वेग

वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन लसींना मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय केंद्रीय औषध नियंत्रक संस्थेने (डीसीजीआय) लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह-डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून दिली. 6 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, …

Read More »

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्करप्रमुखपदी निश्चित करण्यात आले आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकार्‍यांच्या श्रेणीत पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे …

Read More »

वादंगाची हनुमान उडी

मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्‍या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार …

Read More »

शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल कोल्हापूर ः प्रतिनिधी हिंदूत्ववादी शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकार्‍याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, …

Read More »

देश बदलतोय, प्रगती करतोय!

पंतप्रधान मोदींकडून भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधी भारतात निराशा होती. आज देशातील प्रत्येक जण म्हणतोय की देश बदलतो आहे, गतीने प्रगती करतो आहे. कसल्याही भीतीविना आपल्या हितांसाठी लोक काम करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 6) केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना …

Read More »

भारतीय वस्तूंना जगभरात वाढती मागणी

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताने 400 अब्ज डॉलर्सचे निर्यातीचे ध्येय गाठले आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवते. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे, असे सांगितले. पंतप्रधान …

Read More »

यंदा मान्सून चांगला बरसणार!

हवामान खात्याचा अंदाज नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्याच्या चारही महिन्यांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने दुष्काळ पडणार नसल्याचेही भाकित वर्तवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने या वर्षी चांगल्या …

Read More »

जगभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशात मोठ्या वेगाने कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात …

Read More »

एमआयएमच्या प्रस्तावावर दावे-प्रतिदावे

मुंबई ः प्रतिनिधी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर देऊन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राऊतांच्या टीकेवर जलीलांचा पलटवार खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने ही ऑफर धुडकावून लावली आहे, मात्र …

Read More »