औरंगाबाद ः प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्याने हा वाद उफाळून आला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकारकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यात काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला …
Read More »दहशतवाद्यांविरोधात एकत्रपणे काम करा -अमित शाह
श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौर्यावर आहेत. उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट 2019मध्ये …
Read More »काँग्रेसमध्ये मनमानी कारभार!
निलंबित पदाधिकार्याचा उपोषणाचा इशारा; बाळासाहेब थोरातांवर नाव न घेता आरोप अहमदनगर : प्रतिनिधी पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या आरोपावरून पदावरून निलंबित करण्यात आलेल्या अहमदनगर शहरातील बाळासाहेब भुजबळ यांनीच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. निलंबन कारवाईबाबत झालेल्या अन्यायाविरोधात मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, …
Read More »सणासुदीत मेड इन इंडिया वस्तू खरेदी करा -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी सणांमध्ये मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एकेकाळी परदेशी वस्तूंची खूप क्रेझ होती, पण आज मेड इन इंडियाची शक्ती खूप वाढली आहे. आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी मेड …
Read More »पटोलेंचे धक्कातंत्र सुरूच; काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याचे पक्षातून निलंबन
अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याला धक्का दिला आहे. यावरून काँग्रेस पक्षातील खळबळ सुरू असल्याचे दिसत आहे. पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित …
Read More »लसीकरणात भारताचा महाविक्रम; कोरोना प्रतिबंधक 100 कोटी लसींचा टप्पा पार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशाने गुरुवारी (दि. 21) भारताने एक इतिहास रचला आहे. देशात कोविड लसीकरणात 100 कोटी डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे, असे म्हटले आहे. इतक्या जलद गतीने लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणारा भारत …
Read More »देशाला फसवणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे -मोदी
नवी दिल्ली ः देशाची फसवणूक करणार्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो. जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल तर त्यावर कारवाई करताना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मुख्य दक्षता आयोग …
Read More »राजू शेट्टींचा मविआ सरकारवर हल्लाबोल
कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सातार्याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला तसेच दसर्याला शेतकर्यांचा शिमगा करणार्या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असे आवाहन शेतकर्यांना केले. …
Read More »ठाकरे सरकारची पुरगस्तांना तुटपुंजी मदत
व्यापार्यांसह भाजपचे सांगलीत आंदोलन सांगली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसान भरपाईपोटी व्यापार्यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र व्यापार्यांना 200 रुपये ते एक हजार 500 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या या …
Read More »भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली. याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरू असणार्या चकमकींमध्ये नऊ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीत भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper