Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अनिल देशमुखांना ईडीचा दणका; मुंबई, उरणमधील चार कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपये किमतीची संपत्ती जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच पत्नी आरती …

Read More »

दहावीचा निकाल 99.95 टक्के; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली, तर एकूण निकालात …

Read More »

नवी मुंबईत भाजपकडून घरोघरी मास्कचे वाटप

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ नोडमधील प्रभाग 96मध्ये नेरूळ सेक्टर 16, 16ए आणि 18 या परिसरात श्री. गणेशजी नाईक चॅरिटेबल संस्था आणि भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून मास्क वाटपास सुरूवात झाली आहे. सेच्युरी सोसायटीमध्ये घरोघरी जावून मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील …

Read More »

ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधार्‍यांसोबत राहणार ; देवेंद्र फडणवीस यांचे भुजबळांना आश्वासन

मुंबई ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासाठी आपण एकत्रितपणे काम करू. त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन. तुम्ही त्याचे नेतृत्व करा, असे आश्वासन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. 15) देवेंद्र फडणवीस …

Read More »

ठाकरे सरकारने थकविले 90 कोटी; 18 औषध वितरक मागणार ‘इच्छामरण’

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनामुळे आर्थिक संकटात असतानाही राज्यातील सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणार्‍या 18 वितरकांची तब्बल 90 कोटींची देयके ठाकरे सरकारने थकविल्याचा आरोप वितरकांनी केला आहे. हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडमधील खरेदी कक्षाकडून ही देयके मागील 18 महिन्यांपासून थकविली आहेत. त्यामुळे कच्च्या मालाची देयके, कर्मचार्‍यांचे वेतन, कर्जाचे हप्ते थकल्याने आमच्याकडे …

Read More »

सिडकोकडून मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी ऐरोलीतील भूखंडाचे शासनाकडे हस्तांतरण

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे मंगळवारी (दि. 13) मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्‍यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. …

Read More »

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा गौरवशाली जीवनपट वेबेक्सवर

खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनसंघाचे संस्थापक तसेच भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन 23 जून आणि जन्मदिन 6 जुलै या पंधरवड्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ स्तरावर अनेक कार्यक्रम झाले. खारघर तळोजा मंडल अंतर्गत …

Read More »

विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग

नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असताना आता वाहनधारकांनी चक्क मनपाच्या कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या आवारातच खासगी वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. येथे रोज संध्याकाळी आजूबाजूच्या …

Read More »

माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधीमाजी क्रिकेटपटू आणि 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.1983च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर …

Read More »

उद्धव ठाकरेंची माझ्यावर पाळत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांची मोट बांधण्यात …

Read More »